मुंबईः राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याच्या सरकारच्या नव्या प्रस्तावाविरोधात मंगळवारी देशभरातील डॉक्टरांनी लाक्षणिक संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशनशी निगडीत देशभरातील सुमारे ३ लाख डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. दरम्यान, डॉक्टरांच्या संपाचा फटका रुग्णांना बसत आहे. अनेक ठिकाणी शस्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. खासगी व सरकारी रूग्णालयातील ओपीडी ठप्प राहणार असल्यामुळे रूग्णांचे मोठे हाल होणार आहेत. सरकार या आयोगासाठी आज संसदेत विधेयक आणणार आहे. जर हे विधेयक संमत झाले तर वैद्यकीय इतिहासातील हा काळा दिवस असेलअसे डॉक्टरांचे म्हणणे आहे.