सर्वच बँका हात घोटाळ्याने माखलेले असून दिवसेंदिवस विविध बँकांचे घोटाळे उघडकीस येत आहे. प्रथम पंजाब नॅशनल बँकेचा 11 हजार 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर त्यासोबत जोडलेल्या तीन ते चार बँकांती बेकायदेशीर गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी परदेशात पळून गेला आहे. तर त्यानंतर रोटोमॅकटा मालक विक्रम कोठारीने साडेतीन हजार कोटींना बँकांना गंडा घातला आल्याचे उघडकीस आले. त्याला व त्याच्या मुलाला अटक करण्यात आली असली तरी बँकांनी या लोकांना एवढेमोठे कर्ज कशाच्या हमीवर दिले होते, असा प्रश्न सर्वसामान्यांना कर्ज नाकारणाऱ्या सर्व नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही.

याच दरम्यान, बँक घोटाळ्यात आता आणखी एका घोटळा समोर आला आहे. तो म्हणजे ओरिएन्टल बँकेचा. एका ज्वेलरी निर्यातदाराने ३९० कोटींचा या बँकेला चुना लावल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील हिरे व्यापारी आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या द्वारकादास सेठ इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने हा घोटाळा केला आहे. दिल्लीतल करोलबाग भागात ही कंपनी आहे. या कंपनीच्या चार संचालकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हे चौघेही मागील १० महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे ते परदेशात पळून गेले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.