इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरुद्ध पोलिसांनी दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. नेतन्याहू यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप यात असून आर्थिक अपहाराचा आरोपही लावण्यात आला आहे. त्यांना पदावर का ठेवावे, असे आपल्या लेखी आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार नाही, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. १४ महिने ही चौकशी सुरू होती. पोलिस विभागाकडे त्यांच्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे. ६८ वर्षीय नेतन्याहू हे दोन वेळा पंतप्रधानपदावर राहिले आहेत.

२००९ मध्ये नेतन्याहू प्रथम पंतप्रधानपदी निवडून आले होते. १९९६ पासून ते विविध राजकीय पदांवर आहेत. पोलिस विभागाने म्हटले आहे की, ३ लाख अमेरिकी डॉलर्सची लाच त्यांनी विविध मार्गांनी स्वीकारली आहे.