नागपूर, राज्यातील धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णावर उपचार नाकारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सदस्य संजय दत्त यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

डॉ. पाटील म्हणाले, धर्मदाय रुग्णालयांना गरीबांसाठी 20 टक्के बेड राखून ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहे. याबाबत अशा रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यात येते. दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दराने उपचार मिळण्याकरीता मंजूर केलेल्या योजनेत कसूर केल्यास अशा रुग्णालयावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.