Connect with us

क्रीडा

सिडनी कसोटीवर भारतीय संघाचे वर्चस्व

Mahabatmi

Published

on

सिडनी – पावसाने सातत्याने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गुंडाळला. तसेच पहिल्या डावात 322 धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन खेळण्यास भाग पाडले आहे.

पावसाच्या व्यत्ययानंतर खेळास सुरुवात झाल्यावर मोहम्मद शमीने पॅट कमिन्सची (25) विकेट काढत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराने पीटर हँडस्कोंबला (37)  माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने नाथन लायनची विकेट काढत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. मात्र मिचेल स्टार्क ( नाबाद 29) आणि जोस हेझलवूड ( 21) यांनी शेवटच्या विकेटसाठी चिवट फलंदाजी करत संघाला 300 पार मजल मारून दिली. अखेरीस कुलदीप यादवने हेझलवूडची विकेट काढून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून कुलदीप यादवने 5, जडेजा आणि शमीने प्रत्येकी दोन तर बुमराने एक गडी टिपला.

Advertisement

क्रीडा

टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याच्या जागी विजय शंकर

Mahabatmi

Published

on

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या विरोधात वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी ऑलराउंडर विजय शंकर आणि फलंदाज शुभमन गिल यांना टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दोघांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांची जागा घेतली आहे. हार्दिक आणि राहुल यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बीसीसीआयने दोघांनाही निलंबित केले. नवीन खेळाडूंपैकी विजय ऑस्ट्रेलियात वनडे मालिकेत टीम इंडियाशी जोडला जाणार आहे. तर शुभमन न्यूझीलंड मालिकेत भारतीय संघात खेळणार आहे.

Continue Reading

क्रीडा

IND vs AUS 3rd Test 4th Day : मेलबर्न कसोटीत भारत मजबूत स्थितीत

Mahabatmi

Published

on

IND vs AUS 3rd Test 4th Day

मेलबर्न | मेलबर्न कसोटीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने तीन बाद 105 धावांची मजल मारली आहे. त्याआधी आजच्या पहिल्या सत्रात भारताने आपला दुसरा डाव आठ बाद 106 धावांवर घोषित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान मिळालं. भारताकडून मयांक अगरवालने 42 धावांचं योगदान दिलं. तर रिषभ पंतनं 33 धावांची खेळी केली. भारत वि. ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या हाताशी सध्या भक्कम आघाडी जमा आहे.

टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची मोठी आघाडी घेतली खरी, पण दुसऱ्या डावात भारताची पाच बाद 54 अशी दाणादाण उडाली. अर्थात या परिस्थितीतही या कसोटीवर टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने एकूण 346 धावांची आघाडी मिळवली होती

Continue Reading

क्रीडा

चौदा वर्षांनी भारतीय सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियात खेळले 100 पेक्षा अधिक चेंडू

Mahabatmi

Published

on

मेलबर्न- आपली पहिली कसोटी खेळत असलेल्या मयंक अग्रवालने (७६) शानदार अर्धशतक झळकावत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताने २ बाद २१५ धावा काढल्या. १४ वर्षांनी टीम इंडियाच्या सलामीवीराने ऑस्ट्रेलियात १०० पेक्षा अधिक चेंडू खेळले. यापूर्वी २००४ मध्ये आकाश चोपडा आणि वीरेंद्र सेहवागने सिडनीत २३५ चेंडूंचा सामना केला होता. चेतेश्वर पुजारा ६८ चेंडूंवर नाबाद अाहे. चार सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे.

नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात टीम इंडियाने मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी (८) यांना सलामीला पाठवले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११३ चेंडूंत ४० धावांची भागीदारी केली. या वर्षी भारताने सहा सलामी जोड्या कसोटीत उतरवल्या. विहारीला वेगवान गोलंदाज कमिन्सने बाउन्सरवर बाद केले. त्यानंतर मयंकने दुसऱ्या विकेटसाठी पुजारा (६८*) सोबत ८३ धावा जोडल्या. मयंकलादेखील कमिन्सनेच बाद केले. पुजाराने कर्णधार विराट कोहलीसोबत (४७*) नाबाद ९२ धावांची भागीदारी केली. पुजाराचे हे कसोटीतील २१ वे अर्धशतक ठरले. चालू मालिकेत त्याने आतापर्यंत एक शतक व दोन अर्धशतकांसह २९० धावा काढल्या. कोहली २२४ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.