Connect with us

क्रीडा

IND vs AUS 3rd Test 4th Day : मेलबर्न कसोटीत भारत मजबूत स्थितीत

Mahabatmi

Published

on

IND vs AUS 3rd Test 4th Day

मेलबर्न | मेलबर्न कसोटीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने तीन बाद 105 धावांची मजल मारली आहे. त्याआधी आजच्या पहिल्या सत्रात भारताने आपला दुसरा डाव आठ बाद 106 धावांवर घोषित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान मिळालं. भारताकडून मयांक अगरवालने 42 धावांचं योगदान दिलं. तर रिषभ पंतनं 33 धावांची खेळी केली. भारत वि. ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या हाताशी सध्या भक्कम आघाडी जमा आहे.

टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची मोठी आघाडी घेतली खरी, पण दुसऱ्या डावात भारताची पाच बाद 54 अशी दाणादाण उडाली. अर्थात या परिस्थितीतही या कसोटीवर टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने एकूण 346 धावांची आघाडी मिळवली होती

Advertisement

क्रीडा

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी

Mahabatmi

Published

on

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत माजी क्रिकेटपटू राज्यसभेतील खासदार सचिन तेंडुलकर याने शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. सचिनने एकाच महिन्यात तिस-यांदा पवारांची भेट घेतली. पवार आणि सचिन यांच्या भेटीमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

लोकसभेच्या रणधुमाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर आता सचिननेही पवारांची भेट घेतल्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. ही भेट खासगी कारणासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी यामागे राजकीय गणित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सचिनने पवारांच्या वरळीतील सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट घेतली. यानंतर तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र या चर्चेचा नेमका तपशील अजूनही समजू शकलेला नाही. पवारांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सचिननेही प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.

पवारांचा राजकीय चमत्कार करण्याचा एकूण लौकिक पाहता या भेटीमुळे सर्वांची उत्सुकता वाढली आहे. काँग्रेस महाआघाडीने ही निवडणूक महत्वाची केली असून मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे विशेष लक्ष आहे. त्या दृष्टीकोनातून तर ही भेट नाही ना, अशीही चर्चा सुरु आहे.

Continue Reading

क्रीडा

नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत

Mahabatmi

Published

on

हैदराबाद : हैदराबादमध्ये शनिवारी भारतीय टीमच्या नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिली वनडे २ मार्चपासून सुरु होणार आहे. 37 वर्षाच्या धोनीच्या हाताला दुखापत झाली आहे. पहिल्य़ा वनडेच्या आधी धोनी सराव करत होता. राघवेंद्रच्या बॉलिंगवर त्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर धोनीने सराव न करण्याचा निर्णय घेतला. ही दुखापती किती गंभीर आहे याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण संध्याकाळ पर्यंत धोनी पहिला सामना खेळणार की नाही हे स्पष्ट होईल.

जर धोनीला दुखापतीमुळे खेळता नाही आलं तर ऋषभ पंत त्याच्या जागी विकेटकीपिंग करेल. धोनीच्या ऐवजी बॅट्समन म्हणून लोकेश राहुल किंवा अंबाती रायडूचा देखील संघात समावेश होऊ शकतो.

भारतीय टीमनं घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सीरिज गमावली. दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा ७ विकेटनं पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलियानं ही टी-२० सीरिज २-०नं जिंकली. या पराभवानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Continue Reading

क्रीडा

टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याच्या जागी विजय शंकर

Mahabatmi

Published

on

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या विरोधात वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी ऑलराउंडर विजय शंकर आणि फलंदाज शुभमन गिल यांना टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दोघांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांची जागा घेतली आहे. हार्दिक आणि राहुल यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बीसीसीआयने दोघांनाही निलंबित केले. नवीन खेळाडूंपैकी विजय ऑस्ट्रेलियात वनडे मालिकेत टीम इंडियाशी जोडला जाणार आहे. तर शुभमन न्यूझीलंड मालिकेत भारतीय संघात खेळणार आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in