Connect with us

राजकीय

बाळासाहेबांनी आधी संजय दत्तला वाचवलं; नंतर म्हणाले त्याला फाशीवर चढवा…

Mahabatmi

Published

on

When Balasaheb Thackeray Gets Angry On Sanjay Dutt

मुंबई | राजकीय नेते आणि सिने अभिनेत्यांची दोस्ती ही गेली अनेक दशकं महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. अशोक चव्हाण-महेश मांजरेकर, उद्धव ठाकरे-अवधूत गुप्ते, बाळासाहेब ठाकरे-दादा कोंडके अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. यामध्ये एका मैत्रीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ती मैत्री म्हणजे सुनिल दत्त-बाळासाहेब ठाकरे. ही मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होती. या मैत्रीचे अनेक किस्से अनेकजण अनेक प्रकारे सांगत असतात. मात्र या मैत्रीचा  एक वेगळा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे नेमका हा किस्सा??

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधरित ‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि सुनील दत्त यांच्या मैत्रीचा किस्सा उलगडून दाखवण्यात आला आहे.

1993 साली मुंबईत साखळी बाॅम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात संजय दत्त याच्यावर आरोप झाले आणि त्याला जेलमध्ये जावं लागलं. यानंतर काही दिवसांनी सुनिल दत्त आपल्या जिवलग मित्राच्या बाळासाहेब ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर पोहचले. संजयला आपण मदत करावी… त्याला आपण तुरूंगातून बाहेर काढावं, अशी विनंती बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी केली.

जिवलग मित्रासाठी कायपण-

मदत करताना बाळासाहेब ठाकरे सुनिल दत्तला म्हणाले, मी तुझ्यासाठी हे सगळं करतोय. संजयचं मला काहीही देणघेण नाही, असं म्हणतं बाळासाहेबांनीही आपल्या जिवलग मित्राला निराश केलं नाही. आपल्या करिश्म्याने बाळासाहेबांनी संजय दत्तला मदत केली आणि संजय दत्त जेलबाहेर सुटून आला. यानंतर संजय दत्तने बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानले होते. त्याला त्याच्या भावना देखील आवरता आल्या नव्हत्या. तो ढसाढसा रडला होता.

नंतर म्हणाले त्याला फाशी द्या मला काही फरक पडत नाही…

1993 मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त काही काळ जेल भोगून आला होता. मात्र संजय दत्तवर आरोप सिद्ध झाले आणि संजय दत्त चौकशीच्या फेऱ्यात अडकला. यावर बाळासाहेब ठाकरेंना त्यावेळी विचारले असता, तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या मला काही फरक पडत नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

Advertisement

राजकीय

भाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी

Mahabatmi

Published

on

पुणे । मावळ लाेकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना पहिलेच तीन मिनिटांचे लिखित भाषणही नीट वाचता न आल्याने साेशल मीडियात ते माेठ्या प्रमाणात ट्राेल झाले. त्यामुळे यापुढील सभेत पार्थ नेमके काय बाेलतात अशी उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाेबतच नागरिकांना हाेती. बुधवारी मावळ तालुका प्रचार कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव मावळ येथे अायाेजित करण्यात अाला.

यात गावपातळीपासून माजी मंत्र्यापर्यंत अनेकांनी भाषणे केली. मात्र, उमेदवार पार्थ पवार यांनी जाहीर सभेत बाेलणे टाळले. पहिल्याच भाषणाची खिल्ली उडवली गेल्याने प्रसार माध्यमांपासून तूर्त तरी दूर राहा, भाषण आणि प्रतिक्रिया देण्याच्या फंदात न पडता फक्त गाठीभेटीवर भर दे, असा तंबीवजा सल्ला पवार कुटुंबीयांतून पार्थ यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Continue Reading

राजकीय

दाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर

Mahabatmi

Published

on

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सरेंडर व्हायला तयार होता. तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे याबाबत प्रस्तावही दिला होता. मात्र, पवारांनी व्यक्तिगत पातळीवर निर्णय घेऊन प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.शरद पवार यांनी ही माहिती पंतप्रधान दिली होती का? त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला का? आणि घेतला तर असा निर्णय घेणारे पवार कोण?, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. आंबेडकरांनी सांगितले की, मी राज्यसभेत खासदार होतो. त्यावेळी राम जेठमलानी देखील खासदार होते. आम्ही दोघे मित्र होतो. त्यांनीच मला ही माहिती पहिल्यांला दिली होती.

Continue Reading

राजकीय

लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय: राज ठाकेर

Mahabatmi

Published

on

मुंबई – राजकीय पटलावर धुमधडाक्यात एंट्री करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पहिल्याच प्रयत्नात १३ आमदारांसह महाराष्ट्रभर दरारा निर्माण करणाऱ्या मनसेकडे आज एकही आमदार शिल्लक नाही. गेल्या काही वर्षांतील अनेक घडामोडींचा मनसेला फटका बसला आहे. परंतु आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेत लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकत व्यर्थ न घालवता विधानसभा निवडणुकीत २००९ प्रमाणे करिष्मा करण्याची तयारी राज ठाकरे यांनी केल्याची भावना सध्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे.

राज ठाकरे यांनी २००९ मध्ये मनसेची स्थापना केली होती. पहिल्याच प्रयत्नात राज यांनी १३ आमदार निवडून आणले होते. ही कामगिरी मनसेचा आत्मविश्वास वाढविणारी होती. त्यापाठोपाठ नाशिक महानगर पालिका एकहाती मिळविण्याची किमया मनसेने केले होती. परंतु त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा लागली. त्यातून आतापर्यंत पक्ष सावरलेला नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत राज ठाकरे यांनी शिवसेनेविरुद्ध उमेदवार दिले होते. यामध्ये मनसेचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मनसेची अनामत रक्कम जप्त झाली होती. या नामुष्कीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील मनसेची धुळधान झाली. १०० हून अनेक जागा लढविणाऱ्या मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता. तो देखील आज शिवसेनेते गेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला असणाऱ्या राज ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये राज यांची नक्कीच मोठी योजना असणार आहे. त्यातही मनसे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसेची ताकत कमी पडणार हे निश्चितच आहे. तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्च होणार आहे. हा खर्च केल्यानंतर काही महिन्यातच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकाच्या तयारीसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.