Connect with us

राजकीय

संविधानाचे रक्षण हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली: खा.अशोक चव्हाण

Mahabatmi

Published

on

Ashok-Chavan

दर्यापूर, जि. अमरावती | देशात पसरलेल्या जातीवादाचा विरोधकरण्याकरिता व संविधानाचे रक्षणकरण्याकरिता काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून,बाबासाहेबांचे जातीवादाविरोधातील विचार वत्यांनी दिलेल्या संविधानाचे प्राणपणाने रक्षणकरणे, हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असेमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्याचौथा टप्प्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरूवातआज महापरिनिर्वाण दिनी अमरावतीशहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरून झाली.

संघर्ष यात्रा दर्यापूर शहरातपोहोचल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीसंविधानाची प्रत ठेवलेली पालखी खांद्यावरघेऊन बसस्थानक चौक ते महात्मा गांधीपुतळ्यापर्यंत ‘संविधान बचाओ’ दिंडीकाढण्यात आली. या दिंडीत माजी मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री वसंत पुरके, आ.विरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, जिल्हाकाँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेशकाँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंतमाजी, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा,शाम उमाळकर, अनंतराव घारड, मदन भरगड,चिटणीस शाह आलम, प्रदेश प्रवक्ते सुधीर ढोणेयांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी वहजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणिभाजपने कायम संविधानाच्या विरोधातभूमिका घेतली आहे.

मनुस्मृतीसारखा ग्रंथअसताना संविधानाची गरजच काय? असेभाजप व संघाचे मत आहे. संविधानाबद्दलआदर नसल्यानेच आज देशामध्ये संवैधानिकसंस्थांचे अवमूल्यन आणि संविधानाने प्रदानकेलेल्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होतेआहे. गेल्या चार वर्षात मोठा संविधानालाधोका निर्माण झाला असून, संविधानरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकारघेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रतिकात्मकजनजागृती म्हणून काँग्रेसने ‘संविधान बचाओदिंडी’ काढल्याचे खा. अशोक चव्हाण म्हणाले.देशातील संविधान बदलून येथील कारभारमनुस्मृतीप्रमाणे चालावा, असा राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचा मानस आहे.

संघाच्याइशाऱ्यावर विद्यमान सरकार हुकूमशाहीपद्धतीने काम करते आहे. देशाचे संविधानधोक्यात आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देशाचेसंविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीआपल्या प्राणाची बाजी लावतील. संविधानबदलण्याचा भाजपचा डाव काँग्रेस पक्षकधीही यशस्वी होऊ देणार नाही. देशातीलनागरिकांनीही लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधानाची पालखी खांद्यावर घ्यावी, हीच यामागील भावना असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

Advertisement

राजकीय

‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं – धनंजय मुंडे

Mahabatmi

Published

on

कल्याण सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले आणि देशातील जनतेला फसव्या विकासाचा नाद लावला. आणि ‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या पाचव्या दिवशी कल्याणच्या गुण गोपाळ मंदिर परिसरात आयोजित आजच्या सभेत ते बोलत होते.

साडेचार वर्षांत प्रत्येकाच्या खिशातून दीड लाखांची लूट केली परंतु चौकीदाराने तुम्हाला त्याची भनक लागू दिली नाही. नोकरी देतो सांगून तरुणाईला फसवलं आणि जीेसटीमधून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले… नोटाबंदीने या देशाचे आर्थिक कंबरडं मोडलं यातून आजही देशातील जनता सावरलेली नाही अशी परिस्थिती असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्यातील आणि केंद्रातील प्रश्नांबरोबरच धनंजय मुंडे यांनी स्थानिक प्रश्नाकडेही लक्ष वेधले.

महानगरपालिका निवडणुकांपूर्वी कल्याण-डोंबिवलीकरांना सेना, भाजपाने अनेक आश्वासनं दिली. हजारो कोटींचा निधी देण्याची स्वप्न दाखवली. मिळाला का निधी? तुम्हीच ठरवा पुन्हा तिच चूक करणार की परिवर्तनात आम्हाला साथ देणार? असा सवाल केला.

कल्याण-डोंबिवली शहरात बरेच प्रश्न प्रलंबित आहे. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा इ. ही यादी न संपणारी आहे. कल्याण-डोंबिवलीकरांनी आम्हाला आशीर्वाद द्या. मी शब्द देतो, सगळे प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.

*’फटाकेच आहे ते कधीतरी थांबणारच’*

कल्याण-डोंबिवली सभेच्या ठिकाणापासून काही अंतरावर अचानक सुरू झालेल्या आतीषबाजीचा संदर्भ घेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर उपहासात्मक टीका केली. ‘आवाज दाबण्याचा नवीन प्लॅन आहे का?’ असा खोडकर प्रश्न विचारत त्यांनी सरकारच्या दडपशाहीवर टीका केली. आणि ‘फटाकेच आहे ते कधीतरी थांबणारच’ असं म्हणत सरकारच्या गच्छंतीचे संकेत दिले.

संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार जगन्नाथ शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आदींसह कल्याण येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

राजकीय

त्या माथेफिरूला तात्काळ जेरबंद करा , अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील – धनंजय मुंडे

Mahabatmi

Published

on

dhananjay-munde

उल्हासनगर | संत भगवानबाबांची मूर्ती जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय निषेधार्ह आणि भावना दुखावणारी आहे. हे कृत्य करणा-या त्या माथेफिरूला तात्काळ जेरबंद करा , अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांची मुर्ती जाळण्याचा प्रयत्न होतो. त्या माथेफिरूची ओळख पटलेली असते, तरी त्याला बेड्या का ठोकल्या जात नाहीत. पोलीस कशाची वाट पाहत आहेत असा सवाल करून या माथेफिरुवर कारवाई करण्याची जबाबदारी शासनाची, गृह विभागाची आणि पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे, त्याला तात्काळ जेरबंद करावे. नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी ही सरकारची, गृह विभागाची आहे. माझ्याप्रमाणेच संत भगवान बाबांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व जाती-धर्मातील लोकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असेही ते म्हणाले.

Continue Reading

राजकीय

मोदी भक्तांची अवस्था ही पाळण्यातील लहान मुलासारखी झाली। धनंजय मुंडे

Mahabatmi

Published

on

मुरबाड साडेचार वर्षात संपूर्ण देशाची फसवणूक झाली आहे तरीही मोदी भक्तांची आशा आणखी ही संपली नाही. लहान मुलांना जसे  वाटते की आंगठा सतत तोंडात घालून चोखला की त्यातून दूध येईल असाच त्यांचा पाळण्यातील लहान मुलांसारखा भ्रम अच्छे दिनाबाबतसुद्धा झाला आहे अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी भक्तांना चिमटा काढला आहे.

मुरबाड जिल्हा ठाणे येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.  युती सरकारच्या १६ मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यानिशी सादर केले, पण आमच्या मुख्यमंत्र्यांकडे क्लिनचीट तयार असते. भ्रष्टाचार करणारे मंत्री जितके दोषी आहेत, तितकेच भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठिशी घालणारे मुख्यमंत्रीही दोषी असल्याचे मुंडे म्हणाले.

राज्यातील मंत्र्यांना कोणत्याही अॅंगलने, कोणत्याही ब्रॅण्डचा चष्मा घालून बघा. एक तरी शेतकऱ्याचं पोर दिसतं का? शेतकऱ्यांचं नेतृत्वच या सरकारमध्ये नाही आणि म्हणूनच आज आपल्या शेतकरी बांधवाची ही अवस्था झाली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

पंधरा वर्ष सतत केलेल्या नवसाने भाजपाकडे सत्ता आली. पण यांची परिस्थिती नवसानं पोर जन्मलं आणि मुक्यानं गेलं अशीच होणार आहे. अधिक हव्यासापोटी केलेल्या भ्रष्टाचार रूपी मुक्याने यांची सत्ता गेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुंडे यांनी उपस्थित केला.

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,  माजी मंत्री गणेश नाईक, शशिकांत शिंदे,  राष्ट्रीय  राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जयदेव गायकवाड, आमदार पांडुरंग वरोरा, माजी खासदार संजीव नाईक,  प्रमोद हिंदुराव,  विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.