Connect with us

राजकीय

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी गंभीर घटना हे सरकारचे पाप

Mahabatmi

Published

on

mstc-plans-reverse-auction-of-onions-to-aid-maharashtra-farmers

माजलगांव – सात मुलींच्या नंतर आठव्या बाळंतपणाच्या वेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकासह माजलगाव येथील मीरा रामेश्वर एखंडे या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉ. सूर्यकांत साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींना कडक शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला सरकारने पन्नास लाखांची मदत करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

एखंडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केल्यावर मुंडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, अशोक डक, अरुण इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

२८ डिसेंबर २०१८ रोजी डॉ. सूर्यकांत साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसृती दरम्यान मीरा रामेश्वर एखंडे आणि त्यांच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. एखंडे कुटुंबियांना डॉ. साबळेने अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली. आपला डॉक्टरकीचा धर्म विसरून सुमारे गेल्या आठ वर्षांपासून डॉ. साबळेने माजलगांव ग्रामीण रुग्णालयात निर्दयीपणाने स्वतःचे दुकान थाटले आहे. कधी पत्रकारांना धमकवणे, त्यांच्या विरोधात खोट्या केस करणे असले बेकायदेशीर कृत्य उघडपणे सुरू केले आहेत. डॉ. साबळेवर याआधी कलम ३०७, अट्रोसीटी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच हा डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस राजरोसपणे करत आहे तरीही त्याचे बेकायदेशीर कृत्य दिवसेंदिवस वाढतच आहेत. या सर्व गंभीर बाबींवर धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरला दोन दोन पिस्तूल परवाने सरकार का देत असावे? डॉ. साबळेच्या पाठीशी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या राजकीय वरदहस्त आहे म्हणूनच ही सर्व अनागोंदी सुरू आहे.

“बेटी बचाव बेटी पढाव” चा नारा सरकार देते आणि ७ मुलींना जन्म देणा-या एखंडे कुटुंबाच्या पाठीशी सरकार का उभे राहत नाही? असा खडा सवाल धनंजय मुंडेंनी विचारला आहे.

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी गंभीर घटना हे सरकारचे पाप आहे असेही मुंडे यावेळी म्हणाले. पीडित एखंडे कुटुंबीयांना सरकारने तत्काळ पन्नास लाखांची मदत करावी तसेच सर्व सात मुलींचे पालकत्व शासनाने स्वीकारावे, सोबतच डॉ. सूर्यकांत साबळे, जिल्हा अधिष्ठाता डॉ. अशोक थोरात आणि संबंधित सर्वांची आरोग्य विभागाच्या सचिवांमार्फत चौकशी करावी अशी मागणी मुंडेंनी केली आहे.

Advertisement

राजकीय

सेना-भाजप विरोधात आरपीआय

Mahabatmi

Published

on

कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेची डोकेदुखी वाढली

 

शसेना भाजपा युतीतील मित्रपक्ष आर पी आय आठवले गट सेने विरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार

उल्हासनगर-(गौतम वाघ)-
कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेची डोकेदुखी वाढली असून ,सेना भाजपा युतीतील मित्रपक्ष आर पी आय आठवले गट लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदार संघात आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे उल्हासनगर आरपीआय जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकारांना जाहीरपणे म्हटले आहे,या मतदारसंघात आर पी आय कडून पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार बी.बी. मोरे यांना उमेदवारी देण्यात येणार असुन पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशावरून शिवसेने विरोधात आम्ही उमेदवार रिंगणात उतरवणार आहे,दक्षिण मध्य मुंबई मधून आठवले यांनी शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मागितली होती मात्र सेनेला घाई झाल्याने त्यांनी त्यांचा उमेदवार तिथे घोषित केल्याने शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभा करणार असल्याचे उल्हासनगर आरपीआय जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकारांना जाहीरपणे म्हटले आहे.

Continue Reading

राजकीय

शरद पवारांच्या माघारीमुळे राज्यात यशाची खात्री : प्रकाश आंबेडकर

Mahabatmi

Published

on

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या खासगी सर्वेच्या निकालात वंचित आघाडीला ५० टक्के प्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळेच त्यांनी माढा मतदार संघातून माघारीचा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील आम्ही मानताे. त्यामुळे राज्यभरात वंचित आघाडीला यशाची खात्री असल्याचा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. कुटुंबशाही, एका विशिष्ट जातीचे राजकारणाला पर्याय देण्यासाठी वंचित आघाडीतर्फे जात सांगून उमेदवार देत आहाेत. राष्ट्रवादी व कांॅग्रेस स्पर्धेत आहे असे मानत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वंचित आघाडीच्या जळगाव व रावेर येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव शहरात आयाेजित जाहिर सभेसाठी आंबेडकर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत हा विश्वास व्यक्त केला. आघाडीतर्फे एमआयएम पक्षाला आैरंगाबाद व उत्तर मध्य मुंबई या जागा साेडण्यात आल्या आहेत. चार मतदार संघ साेडून उर्वरित सर्व मतदार संघातील उमेदवार जाहिर केल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading

राजकीय

भाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी

Mahabatmi

Published

on

पुणे । मावळ लाेकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना पहिलेच तीन मिनिटांचे लिखित भाषणही नीट वाचता न आल्याने साेशल मीडियात ते माेठ्या प्रमाणात ट्राेल झाले. त्यामुळे यापुढील सभेत पार्थ नेमके काय बाेलतात अशी उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाेबतच नागरिकांना हाेती. बुधवारी मावळ तालुका प्रचार कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव मावळ येथे अायाेजित करण्यात अाला.

यात गावपातळीपासून माजी मंत्र्यापर्यंत अनेकांनी भाषणे केली. मात्र, उमेदवार पार्थ पवार यांनी जाहीर सभेत बाेलणे टाळले. पहिल्याच भाषणाची खिल्ली उडवली गेल्याने प्रसार माध्यमांपासून तूर्त तरी दूर राहा, भाषण आणि प्रतिक्रिया देण्याच्या फंदात न पडता फक्त गाठीभेटीवर भर दे, असा तंबीवजा सल्ला पवार कुटुंबीयांतून पार्थ यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.