Connect with us

राजकीय

राज ठाकरे उत्तर भारतीयांना जोडण्याऐवजी तोडण्याची भाषा करतायत | संजय निरुपम

Mahabatmi

Published

on

राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.  त्या प्रश्नाला मी जाणून आहे, मी त्याचे समर्थन करतो. मात्र, मुंबईमधील कुठल्याही गरीबावर हल्ला करण्याचा अधिकार त्यांना नाही. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड या राज्यातील सरकारने काही केले नाही म्हणून त्यांना मारणे चुकीचे आहे. हे वाक्य त्यांनी मागे घ्यावे. भारतीय संविधानात असे नमूद आहे, की भारतीय नागरिकत्वानुसार कोणी कुठेही जाऊ शकतो आणि कुठेही राहू शकतो. महाराष्ट्रात राहत असेल, तर नक्की मराठी भाषेचा आदर केला पाहिजे. तेथील संस्कृतीचा, लोकांचा आदर केला पाहिजे. याचा अर्थ हे नाही, की दुसऱ्या भाषेचा अनादर करावा. मी त्या वाक्याचे समर्थन करतो, असेही निरुपम म्हणाले.
मुबंईमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचे विश्लेषण करायची वेळ आली आहे. दुसऱ्या कोणत्या प्रांतामध्ये जाऊन पोलीस ठाण्यात जाऊन नोंदणी करावी, असा कोणताही कायदा नाही. हा कायदा चीनमध्ये आहे. अरुण गवळी, छोटा राजन, दाऊद हे उत्तर भारतातून आले नाही, असेही निरुपम यांनी नमूद केले. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. सुभाष देशमुख हे त्या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही एफआयआर दाखल करावा. अशा बोगस संस्थेवर कारवाई करण्याऐवजी त्यांना परत कर्ज देण्यासाठी कागदाची पूर्तता करण्यासाठी संधी देतात.
मुख्यमंत्री भ्रष्टाचाराला पाठिशी घालत आहेत. राज्य सरकार आपल्या मंत्र्यांच्या विरोधात कोणतीही कडक कारवाई करत नाही. उलट त्यांना पाठीशी घालत आहे, अशा मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये ठेऊ नये, अशी मागणी निरुपम यांनी केली. अदानी पावर लिमिटेडने ऑगस्ट महिन्यात रिलायन्सची वीज कंपनी घेतली आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईचे वीजबील वाढले.  मुख्यमंत्र्यांनी वाढलेल्या बीलाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र ही कारवाई धूळफेक आहे. सरकारने एमईआरसीला आदेश देऊन बील कमी करावे, अशाही मागणी निरुपम यांनी केली.
Advertisement

राजकीय

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर्स करणार प्रचार

Mahabatmi

Published

on

congress star campaigners list 2019

राज्यात दिनांक २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर शेवटच्या चौथ्या टप्प्याच्या मुंबईतील प्रचारासाठी काँग्रेसचे देशभरातील स्टार प्रचारक हजेरी लावण्याची शक्यता आहे. देशभरातील मतदानाचे वेळापत्रक लक्षात घेता कोण कोण बडे नेते राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी हजर राहू शकतात, याबाबतचे नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दक्षिण मध्य मुंबईतही यापैकी काही स्टार प्रचारक प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यासाठी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राज बब्बर, तसेच पक्षातील यंग ब्रिगेडचे ज्योतीरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या दिग्गज नेत्यांच्या तारखा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजते.

राज्यात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिलला होणार असून मुंबई, ठाणे आणि नाशिक यासारख्या महत्वाच्या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष करून मुंबईतील लढतींकडे अवघ्या देशाचे लक्ष असून मुंबईत भाजप-शिवसेनेला मात देण्यासाठी काँग्रेसचे कंबर कसली आहे. दक्षिण मध्य मुंबईतूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते हजर राहणार आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आपल्या सहकाऱ्यांसह गायकवाड यांनी मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे.

पदयात्रा आणि चौकसभांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट संपर्कावर भर दिला आहे. त्यांच्या पदयात्रांना मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली असून दुसऱ्या टप्प्यातील काँग्रेसच्या प्रचाराकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे.

आता मतदानासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असल्याने शेवटच्या आठवड्यातील एकनाथराव गायकवाड यांच्या प्रचारासाठी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राज बब्बर, तसेच पक्षातील यंग ब्रिगेडचे ज्योतीरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या दिग्गज नेत्यांच्या रोड शोज आणि सभांचे नियोजन केले जात आहे. त्यांच्या मुंबई दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्याचे वेळापत्रक जाहिर करण्यात येणार आहे. त्यातच २३ एप्रिलचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे बडे नेतेही मुंबईत प्रचारासाठी दाखल होणार आहेत. एकूणच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या स्टार प्रचारकांच्या सहभागामुळे दक्षिण मध्य मुंबईत चांगलीच रंगत निर्माण होणार आहे.

Continue Reading

राजकीय

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

Mahabatmi

Published

on

NCP former corporator from North east lok sabha seat joined in Shiv Sena

मुंबई | ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू वैती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी येथील माजी नगरसेवक हारून खान यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. हारून खान यांच्या पत्नी ज्योती हारून खान या मुंबई महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका असून हारून खान यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ईशान्य मुंबईत महायुतीला चांगलाच फायदा होणार आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातील विक्रोळी पार्कसाईट येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. शनिवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या कारणाबाबत विचारले असता हारून खान म्हणाले की, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या खुपच कमी असल्याने स्थानिक स्तरावर काम करताना खुपच अडचणी येतात.

माझ्या वार्डमधील रुग्णालयाचे काम निधीअभावी रखडले आहे. तसेच एका सभागृह बांधणीचे कामही रखडले आहे. शिवसेना ही महापालिकेत सत्ताधारी असल्याने आता ही कामे त्वरीत मार्गी लागतील. आपण कुणी बडे नेते नसून स्थानिक स्तरावर काम करणारे एक छोटे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे स्थानिक स्तरावरील कामे मार्गी लावण्यासाठीच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे ते म्हणाले. शिवाय आता महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारातही आपण सहभागी होणार असून माझ्या भागातील अधिकाधिक मते त्यांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल असेही खान म्हणाले. काही दिवसांपुर्वी माजी नगरसेवक नंदू वैती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्थानिक नेतृत्वाची काम करण्याची पद्धत पसंत नसल्याने आपण पक्ष सोडत असल्याचा आरोप करत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांना लक्ष केले होते.

नगरसेवक पदावरून पायऊतार झाल्यानंतर स्थानिक नेतृत्वाकडून आपली साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. याबाबत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना विचारले असता, हारून खान आणि त्यांच्या अगोदर नंदू वैती यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून महत्वाचे नेते आणि पदाधिकारी महायुतीत सामिल होत आहेत, ते पाहता फक्त मतदारांचीच नव्हे तर राजकीय नेत्यांचीही या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा मोदीजी विराजमान व्हावेत, अशी इच्छा असल्याचे ते म्हणाले.

Continue Reading

राजकीय

धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड

Mahabatmi

Published

on

Eknath Gaikwad

मुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.

२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.

धारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.

मात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.

नुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in