Connect with us

राजकीय

मोदींना PUBG वाल्यांचे प्रश्न सोडवायला वेळ आहे, सामान्यांच्या प्रश्नांसाठी मात्र संवेदनशीलता नाही

Mahabatmi

Published

on

dhananjay munde latest speech

मंचर ( पुणे ) | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाच दिवस उलटले. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. लोकांच्या मागण्यांसाठी आण्णां हजारेंनी मोदींना ३६ पत्रं लिहीले. मोंदीकडून फक्त ‘धन्यवाद’ असे उत्तर पाठवले गेले. यांना PUBG वाल्यांचे प्रश्न सोडवायला वेळ आहे, सामान्यांच्या प्रश्नांसाठी संवेदनशीलता नाही, अशी टीका करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांनी पंतप्रधान मोदींच्या वागण्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आयोजित केलेली परिवर्तन यात्रा आज पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पोहोचली. तीस-या टप्पातील सातव्या दिवशीच्या 14 व्या सभेला धनंजय मुंडे भाषणासाठी उभे राहताच उपस्थितांनी घोषणा देत त्यांचे भव्य स्वागत केले.

नवी नवरी घरात आल्यानंतर काम कमी आणि बांगड्याचा आवाज जास्त करते, जेणेकरून शेजाऱ्यांना वाटेल की नवीन सुनबाई खूप काम करते. मोदींची वर्तणुकही नव्या नवरी सारखीच आहे, काम कमी गवगवा जास्त, अशी खरपूस टीका त्यांनी केली.

मंचरमधील परिवर्तन यात्रेची सभा ही थोडी वेगळी भासली. इतर सभांप्रमाणे या सभेत स्थानिक प्रश्नांबाबतचे एकही निवेदन आलेले नाही. एक निवेदन आलं ते बैलगाडी शर्यत सुरू करण्याबाबतचं. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील साहेबांनी केलेल्या विकासाचा, त्यांच्या नेतृत्वाचा लोकांनी मनापासून स्वीकार केलाय हेच यातून दिसत असल्याचे मुंडे म्हणाले.

सरकारकडे दुष्काळासाठी मागितले ८ हजार कोटी आणि दिले ४ हजार कोटी ही परिस्थिती आज आहेत. त्यामुळे याचा विचार करा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा जुमलेबाजी करणाऱ्या सरकारवर जोरदार प्रहार केला.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे आदींसह मंचर, शिरुर,जुन्नर, खेड, आंबेगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisement

राजकीय

भाजप, सेनेत ’25-23’चे सूत्र

Mahabatmi

Published

on

लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युती होणार की नाही, या चर्चेला पूर्णविराम मिळू शकतो. भाजपने लोकसभेच्या २५ व शिवसेनेने २३ जागा लढवाव्यात यावर उभय पक्षांत मतैक्य होण्याचे संकेत असून भाजपच्या कोअर ग्रुपमधील एका मंत्र्याने शंभर टक्के युती होणार असल्याचे संकेत दिले. मनसे राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजप नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेत बदल होण्याचे संकेत आहेत. शिवसेना नेतृत्व या मन:स्थितीत असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने केला.

Continue Reading

राजकीय

शरद पवार यांनी माढा लोकसभा लढवावी : जयंत पाटील

Published

on

By

शरद पवार यांनी माढा लोकसभा लढवावी अशी मागणी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जागा वाटपाबाबत अजून चर्चा सुरू आहे. मित्रपक्ष एकत्र यावेत असे आम्हाला वाटत आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी, याबाबत चर्चा सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

लोकसभेची वेगवेगळ्या मतदारसंघात आखणी करत आहोत. गुरूवारी शरद पवार हे मुंबईमध्ये ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. आघाडीच्या एकत्रितच जागा जाहीर केल्या जातील. वेगवेगळया जाहीर होणार नाहीत, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले.

आज देशात वातावरण बदललेले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी लोकसभेत जावे असे सर्वांना वाटत आहे. शरद पवार हे सर्व पक्षांना एकत्र करून जातीनिशी लक्ष घालत आहेत. भाजप- शिवसेनेचा पराभव करण्याची ज्या पक्षांची इच्छा आहे त्या सर्व पक्षांना बरोबर घेतले जाईल. इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा आता होणार नाही. भेटीगाठीचे पर्व संपले आहे. आता जागा वाटप यावरच चर्चा सुरु आहे असेही पाटील म्हणाले.

लोकसभा संपत आहे. त्यामुळे या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. शिवाय लोकसभेचा प्रचार कसा करायचा यावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading

राजकीय

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांनी केला आग्रह

Mahabatmi

Published

on

पुणे – मी माढ्यामधून निवडणूक लढवावी, अशी पक्षातील नेत्यांची मागणी आहे. पण मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. खरंतर माझी इच्छाही नाही. पण पक्षातील नेत्यांच्या मागणीवर मी विचार करेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांची एक बैठक पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह माढ्यातील सध्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेसाठी काही मतदारसंघातील उमेदवारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी माढ्यातून शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षातील नेत्यांकडून पुढे आली.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.