Connect with us

राजकीय

नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील

Mahabatmi

Published

on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मनात विखे कुटुंबियांबद्दल द्वेष भरला आहे. माझे वडील बाळासाहेब विखे पाटील आज हयात नाहीत. निवडणुकीचा संदर्भ घेऊन हयात नसलेल्या व्यक्तीवर शरद पवारांनी बोलायला नको होते, पवारांची टिका मला बोचली, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. सुजय यांच्या या निर्णयामुळे पक्षश्रेष्ठी संतप्त झाले असून राधाकृष्ण विखे आणि अशोक चव्हाण यांची त्यांच्या पदावरून गच्छंती होणार असल्याचे संकेत काँग्रेस गोटातून मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषद घेउन आपली भूमिका स्पष्ट केली.

आघाडीत जागांची अदलाबदल होत असते. त्यासाठी चर्चा सुरु होती. आघाडीच्या जागा वाढाव्यात यासाठी काँग्रेसने नगरच्या जागेची मागणी केली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार सलग तीनवेळा पराभूत झाला आहे. या मतदारसंघात आमची ताकद आहे, अशी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका होती. आघाडीधर्म पाळण्याची आमची भूमिका कायम होती आणि आहे, असे ते म्हणाले.

माझे वडील बाळासाहेब विखे पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते होते. आज ते हयात नाहीत. शरद पवार यांनी बाळासाहेब विखे यांच्याबद्दल जुन्या घटनांचा संदर्भ घेऊन टीका करायला नको होती. शरद पवार यांनी अशी टीका करेपर्यंत सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय झालेला नव्हता. आता आमच्या कुटुंबियांबद्दल सहकारी पक्षाच्या मनात शंका असेल, तर त्यांच्या प्रचारात जाऊन मी नगरमधील जनतेच्या मनात संभ्रम का निर्माण करू, असा सवाल त्यांनी केला.

Advertisement

राजकीय

सेना-भाजप विरोधात आरपीआय

Mahabatmi

Published

on

कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेची डोकेदुखी वाढली

 

शसेना भाजपा युतीतील मित्रपक्ष आर पी आय आठवले गट सेने विरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार

उल्हासनगर-(गौतम वाघ)-
कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेची डोकेदुखी वाढली असून ,सेना भाजपा युतीतील मित्रपक्ष आर पी आय आठवले गट लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदार संघात आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे उल्हासनगर आरपीआय जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकारांना जाहीरपणे म्हटले आहे,या मतदारसंघात आर पी आय कडून पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार बी.बी. मोरे यांना उमेदवारी देण्यात येणार असुन पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशावरून शिवसेने विरोधात आम्ही उमेदवार रिंगणात उतरवणार आहे,दक्षिण मध्य मुंबई मधून आठवले यांनी शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मागितली होती मात्र सेनेला घाई झाल्याने त्यांनी त्यांचा उमेदवार तिथे घोषित केल्याने शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभा करणार असल्याचे उल्हासनगर आरपीआय जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकारांना जाहीरपणे म्हटले आहे.

Continue Reading

राजकीय

शरद पवारांच्या माघारीमुळे राज्यात यशाची खात्री : प्रकाश आंबेडकर

Mahabatmi

Published

on

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या खासगी सर्वेच्या निकालात वंचित आघाडीला ५० टक्के प्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळेच त्यांनी माढा मतदार संघातून माघारीचा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील आम्ही मानताे. त्यामुळे राज्यभरात वंचित आघाडीला यशाची खात्री असल्याचा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. कुटुंबशाही, एका विशिष्ट जातीचे राजकारणाला पर्याय देण्यासाठी वंचित आघाडीतर्फे जात सांगून उमेदवार देत आहाेत. राष्ट्रवादी व कांॅग्रेस स्पर्धेत आहे असे मानत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वंचित आघाडीच्या जळगाव व रावेर येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव शहरात आयाेजित जाहिर सभेसाठी आंबेडकर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत हा विश्वास व्यक्त केला. आघाडीतर्फे एमआयएम पक्षाला आैरंगाबाद व उत्तर मध्य मुंबई या जागा साेडण्यात आल्या आहेत. चार मतदार संघ साेडून उर्वरित सर्व मतदार संघातील उमेदवार जाहिर केल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading

राजकीय

भाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी

Mahabatmi

Published

on

पुणे । मावळ लाेकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना पहिलेच तीन मिनिटांचे लिखित भाषणही नीट वाचता न आल्याने साेशल मीडियात ते माेठ्या प्रमाणात ट्राेल झाले. त्यामुळे यापुढील सभेत पार्थ नेमके काय बाेलतात अशी उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाेबतच नागरिकांना हाेती. बुधवारी मावळ तालुका प्रचार कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव मावळ येथे अायाेजित करण्यात अाला.

यात गावपातळीपासून माजी मंत्र्यापर्यंत अनेकांनी भाषणे केली. मात्र, उमेदवार पार्थ पवार यांनी जाहीर सभेत बाेलणे टाळले. पहिल्याच भाषणाची खिल्ली उडवली गेल्याने प्रसार माध्यमांपासून तूर्त तरी दूर राहा, भाषण आणि प्रतिक्रिया देण्याच्या फंदात न पडता फक्त गाठीभेटीवर भर दे, असा तंबीवजा सल्ला पवार कुटुंबीयांतून पार्थ यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.