Connect with us

राजकीय

काँग्रेस खोटे बोलण्याचे विद्यापीठ; मोदी

Mahabatmi

Published

on

काँग्रेसने मोदींना हिंदू संस्कृतीविषयी ज्ञान नाही, असे म्हटले होते. त्यावर बोलताना मोदी म्हणाले की, आता निवडणुकांमध्ये ते म्हणताहेत की मोदींना हिंदूंविषयी काही माहिती नाही. मोदींना याविषयी ज्ञान आहे की नाही, यावरुन राजस्थानमध्ये मतदान होणार आहे का? राजस्थानमधील जनतेला वीज, पाणी आणि रस्त्यांसाठी मतदान करायचे आहे की, मोदींना हिंदूंविषयी काय ज्ञान आहे, यावर करायचे आहे. आपल्याकडे ऋषीमुनींनीसुद्धा कधी दावा केला नाही की त्यांना हिंदू आणि हिंदुत्वाविषयी संपूर्ण ज्ञान आहे. हिंदूत्व इतके विशाल आहे की, या ज्ञानाला कवेत घेणं माणसाला शक्य नाही. या ज्ञानाचे भांडार माझ्याकडे आहे, असा दावा मी कधीच करणार नाही. मात्र, नामदार मंडळी असा दावा करू शकतात, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
भारताला ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार मिळाला. याचे श्रेय पर्यावरणाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या बिष्णोई समाजासारख्या अन्य समुदायांना जाते. देशभरातील अनेक समुदायांनी केलेल्या मेहनतीमुळेच हा पुरस्कार मिळू शकला, असेही मोदी म्हणाले.
राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी आगामी ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २०० जागांसाठी हे मतदान होत आहे. यापूर्वीच्या २०१३साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने १६३ जागांवर विजय मिळविला होता.
Advertisement

राजकीय

प्रोटोकॉल तोडून धनंजय मुंडे मध्यरात्रीच बेळगावात….

Mahabatmi

Published

on

Dhananjay Munde at the Vidhan Bhavan for the second day of Maharashtra Legislature special three-day session to pass the state Goods and Services Tax (SGST) bill. The legislature will pass three bills - the main 116-page SGST Act, a bill related to the Compensation to Local Authorities and a bill on to the existing state laws that are to be repealed when the SGST comes into effect from July 1. This is for the first time that the Legislature will have a sitting on a Sunday that is May 21. Express photo by Amit Chakravarty, 21th May 2017, Mumbai. *** Local Caption *** Dhananjay Munde at the Vidhan Bhavan for the second day of Maharashtra Legislature special three-day session to pass the state Goods and Services Tax (SGST) bill. The legislature will pass three bills - the main 116-page SGST Act, a bill related to the Compensation to Local Authorities and a bill on to the existing state laws that are to be repealed when the SGST comes into effect from July 1. This is for the first time that the Legislature will have a sitting on a Sunday that is May 21. Express photo by Amit Chakravarty, 21th May 2017, Mumbai.

बेळगाव | कर्नाटकातील सीमाभागातील मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बेळगावात दाखल झाले आहेत. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये मंगळवारपासून अधिवेशन सुरु होणार आहे.

या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कर्नाटक सरकारच्या बंदीला झुगारुन धनंजय मुंडे बेळगावात दाखल झाले आहेत..

ते सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. धनंजय मुंडेंनी पोलीस बंदोबस्त नसतानाही या मेळ्यात हजर राहण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते रविवारी संध्याकाळीच कोल्हापुरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, “कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेसने कायम पाठिंबा दर्शविला आहे. बेळगावचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने दीर्घ काळापासून लढा दिला आहे. हा लढा पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येईल. तसेच मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येईल”, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे हे मध्यरात्री बेळगावात दाखल झाले, बेळगावात ते मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला संबोधित करणार आहेत..

Continue Reading

राजकीय

तर माझ्या घरची पाच जनावरे मुख्यमंत्र्यांच्या घरी नेऊन सोडेल | धनंजय मुंडे

Mahabatmi

Published

on

five-animals-of-my-house-will-be-taken-to-the-chief-ministers-house-dhananjay-munde

पंढरपूर | दुष्काळात जनतेला आधार देण्याऐवजी दुष्काळात तुमची जनावरे नातेवाईकांकडे नेऊन घाला असा बेजबाबदार सल्ला देणा-या मंत्र्यांच्या घरी शेतकऱ्यांनी खरोखरच आपली जनावरे नेऊन घालावीत मी ही माझ्या घरची 5 जनावरे मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा वर नेऊन घालणार असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे आयोजित विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी मुंडे आज येथे आले असता कार्यक्रमाआधी ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करतांना मुंडे म्हणाले की, सरकार 2 महिन्यापासून फक्त केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवल्याचे सांगत होते . नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मी दुष्काळावरील चर्चेत बोलतांना सरकारने केंद्राकडे मदतीचा आणखी प्रस्तावच पाठवला नसल्याचे सांगितले होते, मुख्यमंत्र्यांनी काल प्रस्ताव पाठवला , यावरूनच मी बोललो ते सत्य होते आणि सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही हे स्पष्ट होते.

दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही, चर्चा करून काही होणार नाही म्हणून आम्ही अधिवेशनात हेक्टरी 50 हजार, फळबागांना एक लाखा रुपये द्यावे अशी मागणी केली होती. संपूर्ण वीज बिल माफ, संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ, mregs चे आराखडे मंजूर करावेत, संपूर्ण कर्जमाफी, टँकरचे अधिकार तहसीलदार यांना द्या, जनावरांना चारा छावण्या, पाण्याची सोय या आमच्या मागण्या कायम असल्याचे मुंडे म्हणाले.

हिरे कुटुंबियांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने पक्षाला मजबूती आली आहे आता घरवापसी जोरात सुरू झाली असून 11 तारखेच्या चार राज्याच्या निकालानंतर ती अधिक वेग घेईल असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

यावेळी आमदार भारत भालके, आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार दीपक आबा साळुंके, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

राज ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर

Mahabatmi

Published

on

Raj-Thackeray

मुंबई | लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. परंतु, या कटाबद्दल आपण आधीच बोललो होतो, राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरयांनी आज लगावला.

‘राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवायची आणि समाजात भय निर्माण करायचे. त्यातून पुन्हा सत्ता मिळवायची, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पुण्यातील सभेत केला होता. नेमका हाच विषय राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील सभेत मांडला.

ओवैसी बंधूंच्या मदतीने राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लिम दंगलीचा कट रचला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यावरून शिवसेनेनं आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी राज यांची खिल्ली उडवलीय. आता प्रकाश आंबेडकर यांनीही राज यांच्यावर ‘कॉपी’चा शिक्का मारलाय. त्यामुळे आता राज ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्यातही खटका उडू शकतो.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

December 2018
M T W T F S S
     
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.