Connect with us

राजकीय

फडणवीसांनी अण्णांच्या पाया पडून सरकार वाचवले

Mahabatmi

Published

on

नागपूर – संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. येत्या २५ तारखेपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्या सोडवायच्या असत्या तर या दोन्ही अधिवेशनांत विधेयक मांडून त्यावर चर्चा घडवून आणता आली असती. पण अण्णांच्या पाया पडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ महिने ते बोलणार नाहीत याची काळजी घेतली आणि आजचे संकट पुढे ढकलले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपुरात केली. अमरावती येथील मेळाव्याला जाण्यासाठी आले असता विमानतळावर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
पाटील म्हणाले, लोकपाल, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अण्णा हजारे वारंवार या मागण्या करत आहेत. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मोदींनी पाच वर्षे काहीच केले नाही. आता पाच राज्ये हातातून गेल्यावर घाबरलेल्या सरकारला शेतकऱ्यांची आठवण झाली. एका वर्षात सहा हजार मदत. तीही टप्प्याटप्प्याने. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. खरे तर सरकारने महिन्याला सहा हजार रुपये द्यायला पाहिजेत, असेही पाटील म्हणाले. सरकारने सरसकट कर्जमाफी करायला हवी होती, पण त्याऐवजी वर्षाला सहा हजार देऊ केले आहेत. संजय गांधी निराधार योजनेतही यापेक्षा जास्त मानधन मिळते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

Advertisement

राजकीय

धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड

Mahabatmi

Published

on

Eknath Gaikwad

मुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.

२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.

धारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.

मात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.

नुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

Continue Reading

राजकीय

मनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज

Mahabatmi

Published

on

Ashish Shelar meets manoj kotak

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.

त्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही  शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.

जनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Mahabatmi

Published

on

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.

उर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.

उर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in