Connect with us

राजकीय

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये औरंगाबाद, नगर, रत्नागिरी-सिंधुदुर्गवरून वाद

Mahabatmi

Published

on

मुंबई लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांतील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांसाठी या दोन्ही पक्षांत अजून चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या कोल्हापूर, रायगड, उस्मानाबाद, परभणी आणि बीड या मतदारसंघांत एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारीसाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या या पाचही मतदारसंघांतील इच्छुकांशी स्वत: शरद पवारांनी चर्चा केली. या चर्चेअंती कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक, तर रायगडमधून सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याचे वृत्त आहे.

विश्वसनीय सूत्रांनुसार, रायगडमध्ये सुनील तटकरे यांचे नाव निश्चित झाले आहे. तर कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्या नावाला पक्षाची पहिली पसंती आहे. रायगडमधून भास्कर जाधव यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र, पवारांनी भास्कर जाधव यांची समजूत काढून तटकरे यांचे नाव निश्चित केल्याचे समजते.

Advertisement

राजकीय

सेना-भाजप विरोधात आरपीआय

Mahabatmi

Published

on

कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेची डोकेदुखी वाढली

 

शसेना भाजपा युतीतील मित्रपक्ष आर पी आय आठवले गट सेने विरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार

उल्हासनगर-(गौतम वाघ)-
कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेची डोकेदुखी वाढली असून ,सेना भाजपा युतीतील मित्रपक्ष आर पी आय आठवले गट लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदार संघात आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे उल्हासनगर आरपीआय जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकारांना जाहीरपणे म्हटले आहे,या मतदारसंघात आर पी आय कडून पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार बी.बी. मोरे यांना उमेदवारी देण्यात येणार असुन पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशावरून शिवसेने विरोधात आम्ही उमेदवार रिंगणात उतरवणार आहे,दक्षिण मध्य मुंबई मधून आठवले यांनी शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मागितली होती मात्र सेनेला घाई झाल्याने त्यांनी त्यांचा उमेदवार तिथे घोषित केल्याने शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभा करणार असल्याचे उल्हासनगर आरपीआय जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकारांना जाहीरपणे म्हटले आहे.

Continue Reading

राजकीय

शरद पवारांच्या माघारीमुळे राज्यात यशाची खात्री : प्रकाश आंबेडकर

Mahabatmi

Published

on

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या खासगी सर्वेच्या निकालात वंचित आघाडीला ५० टक्के प्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळेच त्यांनी माढा मतदार संघातून माघारीचा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील आम्ही मानताे. त्यामुळे राज्यभरात वंचित आघाडीला यशाची खात्री असल्याचा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. कुटुंबशाही, एका विशिष्ट जातीचे राजकारणाला पर्याय देण्यासाठी वंचित आघाडीतर्फे जात सांगून उमेदवार देत आहाेत. राष्ट्रवादी व कांॅग्रेस स्पर्धेत आहे असे मानत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वंचित आघाडीच्या जळगाव व रावेर येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव शहरात आयाेजित जाहिर सभेसाठी आंबेडकर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत हा विश्वास व्यक्त केला. आघाडीतर्फे एमआयएम पक्षाला आैरंगाबाद व उत्तर मध्य मुंबई या जागा साेडण्यात आल्या आहेत. चार मतदार संघ साेडून उर्वरित सर्व मतदार संघातील उमेदवार जाहिर केल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading

राजकीय

भाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी

Mahabatmi

Published

on

पुणे । मावळ लाेकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना पहिलेच तीन मिनिटांचे लिखित भाषणही नीट वाचता न आल्याने साेशल मीडियात ते माेठ्या प्रमाणात ट्राेल झाले. त्यामुळे यापुढील सभेत पार्थ नेमके काय बाेलतात अशी उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाेबतच नागरिकांना हाेती. बुधवारी मावळ तालुका प्रचार कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव मावळ येथे अायाेजित करण्यात अाला.

यात गावपातळीपासून माजी मंत्र्यापर्यंत अनेकांनी भाषणे केली. मात्र, उमेदवार पार्थ पवार यांनी जाहीर सभेत बाेलणे टाळले. पहिल्याच भाषणाची खिल्ली उडवली गेल्याने प्रसार माध्यमांपासून तूर्त तरी दूर राहा, भाषण आणि प्रतिक्रिया देण्याच्या फंदात न पडता फक्त गाठीभेटीवर भर दे, असा तंबीवजा सल्ला पवार कुटुंबीयांतून पार्थ यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.