उल्हासनगर(गौतम वाघ)-उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला उल्हासनगर शहर परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील दुचाकी चोरून कमी पैशात विक्री क

रणाऱ्या बुलेट गँगला अटक केलीआहे. या कारवाईत पोलिसांनी चार संशियतांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन लाख ६५ हजार रुपये किमतीच्या बारा दुचाकी जप्त केल्या आहेत.
उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे आणि पथकातील कर्मचारी शहरात गस्त घालत असताना शहाड रेल्वे स्टेशन जवळ एक मोटारसायकल स्वार संशयास्पद दिसला ,या मोटारसायकल स्वाराकडे पोलिसांनी मोटारसायकल ची कागदपत्रे मागितली असता त्याच्याकडे कागद पत्रे आढळून आली नाही,तेव्हा पोलिसांनी त्या मोटारसायकल स्वारा पोलिसी हिसका दाखवला असतात हि मोटारसायकल चोरी असल्याचे त्याने पोलिसांना माहिती दिली .पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता, त्याने अजून सहा मोटारसायकल चोरी केल्याचा पोलीस तपासत संगितले,ह्या मोटारसायकल ताब्यात घेण्यास पोलीस घटनास्थळावर गेले असता तिथं अजून काही सहाच्यावर मोटारसायकल असल्याचे पाहून पोलिसांनी सदर आरोपीस चौकशी केली असता,त्याने त्याच्या सोबत चोरी करणाऱ्या अजून तीन चोरांची नावे उघड केली,पोलिसांनी लागलीच तीन जणांना अटक करून या सर्वांन कडून चोरीच्या एकूण १२ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.या प्रकरणी पोलिसांनी यश आनंदराव,अहमद शहा,सचिन पवार आणि प्रदीप हिरासिंग उर्फ बाबू या चार जणांच्या बुलेट गँग ला पोलिसांनी अटक केली आहे.