अहमदनगरः शहरातील दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सत्ताधारी आमदार कर्डिले यांना घरात जाऊन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात काल आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली असून आमदार कर्डिले त्यांचे सासरे होत. कर्डिलेंवर हत्येचा कट रचणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड असे दोन गुन्हे दाखल आहेत. पोट निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप या तीन आमदारांवर हत्याकांडाचा आरोप आहे.