कल्याण(गौतम वाघ) : काल रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी घराबाहेर झोपणार्या एका ९२ वर्षीय शेतकर्याची अत्यंत क्रूर पणे हत्या केल्याची घटना कल्याण नजीक मोहने यादव नगर परिसारत घडली आहे .महादेव जाधव असे या मयत शेतकर्याचे नाव असून ते आपल्या पत्नीसह यादव नगर येथील शेतातील घरात राहत होते त्यांची पत्नी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे .या हत्येमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

    कल्याण नजीक मोहने यादव नगर येथे शेतात बांधलेल्या घरात  मनोहर जाधव ९२ हे आपल्या पत्नीसह राहत होते .त्यांची पत्नी एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून तिच्यावर उपचार सुरु आहेत तर त्यांची तीन मुले गावात राहतात .काल रात्रीच्या सुमारास त्यांची पत्नी घरात झोपली असताना अज्ञातांनी मनोहर जाधव यांचा अत्यंत निर्घुण खून केला त्यांचे डोळे फोडण्यात आले होते तर त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले होते .सकाळी त्यांची हत्या झाल्याचे समोर येताच खडकपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत गुन्हा दाखल करत हि हत्या कुणी व का केली याबाबत तपास सुरु आहे.