मुंबईः गेल्या दीड वर्षांपासून जेलची हवा खात असलेले छगन भुजबळ यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. दुपारी एक वाजता त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. छगन भुजबळ यांना मनी लाँड्रिंग व भ्रष्टाचारप्रकरणी विविध गुन्ह्यांतर्गत अटक झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनाही तुरूंगात डांबले आहे. हे चुलते-पुतणे गेली दोन वर्षापासून तुरूंगात आहेत. मात्र, ईडी अथवा इतर तपास यंत्रणांना अद्याप भुजबळांविरोधात आरोप सिद्ध करता आलेले नाहीत. मात्र, त्यांना ईडी व मुंबई हायकोर्टाने वारंवार जामिन मंजूर करण्यास विरोध केल्याचे दिसून आले आहे. अखेर भुजबळ यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.