Connect with us

देश

भाजपशी युतीबाबत शिवसेनेच्या आहेत या तीन अटी ?

Mahabatmi

Published

on

What are demands of Shivsena to have alliance with BJP

नवी दिल्ली | “देशात समान नागरी कायदा लागू केला तर तिहेरी तलाकच्या कायद्याची गरज पडणार नाही. तसेच राम मंदिर बनवणे, कलम 370 रद्द करणे, समान नागरी कायदा लागू करणे याबाबतचे आश्वासन आपण दिले होते. या तीन गोष्टी केल्या तर शिवसेना आपल्या सोबत राहील” असे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केले आहे. तिहेरी तलाकचे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले आहे. या विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे.

लोकसभेत तिहेरी तलाकवर चर्चा सुरु असताना खासदार सावंत म्हणाले, “ज्या मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी तिहेरी तलाकचं हे विधेयक मांडण्यात आले आहे आज त्या नक्कीच आनंदीत असतील. परंतू देशात समान नागरी कायदा लागू केला तर तिहेरी तलाकच्या या कायद्याची गरजच राहणार नाही. तसेच समान नागरी कायद्यासोबत कलम ३७० देखील रद्द करण्यात यावं.”

यावेळी खासदार सावंत यांनी राम मंदिराच्या प्रश्नावर कायदा आणावा असे आवाहन देखील सरकारला केले आहे. “राम मंदिर हा राजकारणाचा विषय नसून देशातील जनतेची भावना आहे. 70 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात चालणं हा संविधानाचा अपमान आहे. राम मंदिराबाबत सरकारने कायदा आणून त्याबाबतचा निर्णय घ्यावा,” असे ते म्हणाले.

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत दुसऱ्यांदा सादर होत आहे. कारण तिहेरी तलाक विधेयक मागच्या वेळी राज्यसभेत पास होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे तो अध्यादेश रद्दबातल ठरला. तिहेरी तलाक विधेयक साधक-बाधक चर्चेसाठी सिलेक्ट कमिटीकडे पाठवावं अशी काँग्रेसची मागणी आहे. तिहेरी तलाक विधेयकात तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या तरतुदीला काँग्रेसने विरोध केला होता. पण ही तरतूद नव्या विधेयकामध्ये ही कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकसभेत तिहेरी तलाकवरुन वादळ उठण्याची चिन्हं आहेत.

Advertisement

देश

डान्स बार पुन्हा सुरू होणार

Mahabatmi

Published

on

 

 

 

नवी दिल्ली – डान्स बारसंबंधी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबईतील डान्सबार पुन्हा सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी निर्णय राखून ठेवला होता. कोर्टात सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारने म्हटले की, राज्य सरकारच्या नव्या कायद्यामुळे बेकायदेशीर कारवाया रोखण्यासह महिलांचे शोषणही कमी होईल. याच कायद्यासंबंधीच्या सुनावणीत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

काय म्हटले कोर्टाने.

– डान्स बारवर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. काही नियम असू शकतात पण पूर्ण बॅन करता येणार नाही. 2005 पासून एकही परवाना दिलेला नाही.

– डान्स बारसाठी परवाना मिळण्यासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

– शैक्षणिक संस्थांपासून डान्सबार 1 किमी च्या आत नसावा ही अटही शिथिल करण्यात आली आहे.

– महाराष्ट्र सरकारच्या डान्सबार संबंधी कायद्यास सुप्रीम कोर्टाने काही बदलांसह परवानगी दिली आहे.
– सुप्रीम कोर्टाने डान्सरला टिप देण्यास परवानगी दिली आहे पण बार डान्सरवर पैसे उधळण्यास मनाई केली आहे.
– अश्लिल नृत्यासंबंधीची परिभाषा कोर्टानेही काय ठेवली आहे.
– कोर्टा बार आणि डान्सिंग एरिया वेगळे ठेवण्याची अट फेटाळली आहे.
– डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्हीचा नियम रद्द करण्यात आला आहे.
– मुंबईत रात्री 11.30 पर्यंच डान्स बारला परवानगी, अश्लिलता असता कामा नये

Continue Reading

देश

नयनतारा भावनावश…

Published

on

By

मुंबई- ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संपूर्ण महाराष्‍ट्राचे आभार मानले आहेत. नयनतारा सहगल यांचे 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटकाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर महाराष्ट्रातील बहुतांश साहित्यिकांनी नयनतारा सहगल यांना पाठिंबा दिला होता. काही साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कारही टाकला होता. त्यानंतर लेखिका नयनतारा सहगल यांनीही महाराष्ट्राचा आभार मानले आहेत.

Continue Reading

देश

‘आयएसआय’चा हनी ट्रॅप; 45 भारतीय जवान फसले

Mahabatmi

Published

on

जोधपूर- पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने जैसलमेर लष्करी तळावर सोमवीरसिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. इतकेच नव्हे तर या हनी ट्रॅपमध्ये तब्बल ४५ जवान अडकले असल्याचे चौकशीतून समोर आले. जवानांकडून माहिती काढून घेण्यासाठी ती व्हिडिओ कॉल करून नग्नावस्थेत नृत्य करत होती. हे जवान महत्त्वाच्या विभागांत व लष्करी तळांवर तैनात होते. प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून अटक केली.

या महिलेने ‘अनिका चोप्रा’ नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून भारतीय जवानांशी मैत्री वाढवली. यात हे जवान अडकत गेले. सोमवीर २०१६ मध्ये अनिकाच्या जाळ्यात अडकला. यानंतर फेसबुकवरील फ्रेंड लिस्टमधील इतर जवानांशी मैत्री वाढवली. त्यामुळे या सर्व जवानांची कसून चौकशी सुरू आहे. राजस्थान सीआयडीसह जोधपूरच्या यंत्रणाही ही चौकशी करत आहेत. आतापर्यंत नेमकी कोणती माहिती बाहेर गेली हे आता स्पष्ट झाले नाही.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.