Connect with us

देश

देश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच

Mahabatmi

Published

on

Those Who Are Looting Nation Have To Fear Says Narendra Modi

देश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला जनता पुन्हा आम्हालाच संधी देणार असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. 2023 मध्ये तुम्हाला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळो असं सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा सत्तेत येईल असं विरोधकांना ठणकावून सांगितलं. हा अहंकाराचा प्रभाव आहे की काँग्रेस 400 हन 40 वर आले आणि सेवभावाचा प्रभाव म्हणून आम्ही 2 हून 200 वर आलो असंही ते यावेळी म्हणाले.

देशाची वायुसेना दुबळी व्हावी ही काँग्रेसची इच्छा असल्याचा गंभीर आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला. काँग्रेसने जवानांना कमजोर केलं असंही ते म्हणाले. काँग्रेस सरकारने आपल्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत. 2016 साली आम्ही सैनिकांसाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

मी माझ्या मर्यादेत राहणं तुमच्यासाठी चांगलं आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना सुनावलं आहे. BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला. लोकसभेत 1947 पासूनच्या गोष्टी सांगण्यात आल्या. पण काँग्रेसला वर्ष कळत नाही. त्यांच्या मते BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे काँग्रेसच्या आधी काहीच नव्हतं आणि जे काही देशाचं झालं आहे ते त्यांच्यामुळेच झालं आहे असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.

नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत सरकारने मिळवलेलं यश सांगितलं. साडे चार वर्षात काय होतं आणि आपण कुठे पोहोचलो आहेत याची तुलना होणार. अर्थव्यवस्था 10,11 व्या क्रमांकावरुन सहाव्या क्रमांकावर पोहोचली. 11 क्रमांकावर पोहोचल्याचा ज्यांना अभिमान होता त्यांना सहाव्या क्रमांकावर आल्याचा अभिमान का नाही ? असा सवाल यावेळी नरेंद्र मोदींनी विचारला.

नरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांवर टीका झालीच पाहिजे. पण मोदी, भाजपावर टीका करता करताना देशाबद्दल वाईट बोलू नका असं यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांना सांगितलं. लंडनमध्ये जाऊन खोटी पत्रकार परिषद करण्यात आली अशी टीका यावेळी नरेंद्र मोदींनी केली.

काँग्रेस देशातल्या न्यायसंस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेकडून महाभियोगाची धमकी दिली जाते, योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले जाते. काँग्रेसने लष्कर प्रमुखांना गुंडांची उपमा दिली असं सांगत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. तुम्ही भारतीय लष्कराच्या मनाला ठेस पोहोचवली आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. आपला निवडणूक आयोग जगासाठी उत्तम उदाहरण आहे आहे, त्यामुळे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा असं आवाहन यावेळी विरोधकांना करण्यात आलं.

जेव्हा महाभेसळ असलेलं सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते असं सांगत नरेंद्र मोदींनी महागंठबधनवर टीका केली. आमचं सरकार बहुमत असलेलं सरकार आहे, त्यामुळे आमचे सरकार देशवासियांसाठी आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरमाना प्रसिद्ध करत आलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचनं आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण केली असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

नरेंद्र मोदींनी विजय मल्ल्याचं नाव न घेता घोटाळा करुन पळून गेलेले ट्विटरवर रडत आहेत असं सांगत विरोधकांना उत्तर दिलं. असा कायदा आम्ही केला. तुम्ही लुटत आहेत त्यांना लुटू दिलंत असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

देश बजेटवर चर्चा करत असताना हे ईव्हीएमवर चर्चा करत होते. एवढे का घाबरले आहात…काय झालंय तुम्हाला असा सवाल नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेसला विचारला. तुमची 55 वर्ष आणि माझे फक्त 55 महिने. मोदींकडे बोट करण्यापूर्वी आपला भूतकाळ तपासा असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Advertisement

देश

पुलवामा:हल्लाच्या ठिकाणापासून 10 किलोमीटरवर राहत होता सुसाइड बॉम्बर

Mahabatmi

Published

on

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हत्यानंतर देशातील जनता आक्रोश करत आहे. दुसरीकडे, हल्ला घडवून अाणणारा सुसाइड बॉम्बर आदिल अहमद दारच्या कुटुं‍बीयांना मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या क्रूरकृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Continue Reading

देश

काश्मीर खोऱ्यात जैश ए महम्मदचे भीषण कृत्य,३९ जवान शहीद

Mahabatmi

Published

on

Continue Reading

देश

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 30 जवान शहीद

Mahabatmi

Published

on

श्रीनगर- जम्मूहून श्रीनगरला जाणार्‍या केंद्रीय राखव दलाच्या (सीआरपीएफ) 70 वाहनांच्या ताफ्याला काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी टार्गेट केले. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यात 2500 जवान होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद ऊर्फ वकास कमांडोने गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता हल्ला घडवून आणला.

पुलवामामधील अवंतीपुरात सीआरपीएफचा ताफा लेथपोरा येथून जात असतानाच दहशतवादी आदिल अहमद याने स्फोटकांनी भरलेल्या कारने जवानांच्या बसला धडक दिली. स्फोट होताच दुसर्‍या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत.

जैश-ए-मोहम्मदचा प्रवक्ता मुहम्मद हसन याने एका लोकल मीडियाशी बोलताना सांगितले की, सीआरपीएफच्या ताफ्यातील दोन बसेसला आम्ही टार्गेट केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी आमच्या संघटनेने स्विकारली आहे. आदिल अहमद ऊर्फ वकास कमांडोने हा हल्ला घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.