Connect with us

देश

नोएडात बसून अमेरिका आणि कॅनडातील लोकांना लावला कोट्यावधींचा चुना

Mahabatmi

Published

on

The Story of cyber thug more than 40 places fake call centres in the country

नोएडा | अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह 12 पेक्षा जास्त देशात माइक्रोसॉफ्ट विंडो यूज लोकांच्या सीस्टीमवर खोटे पॉप-अप मेसेज पाठवून चोरी करणाऱ्या गँगचा भंडाफोड झाला आहे. वेगवेगळ्या सायबर गँगच्या 27 आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. हे सायबर चोर कॉप्यूटर स्क्रीनवर माइक्रोसॉफ्ट वॉर्निंग अलर्ट किंवा विंडो वायरस अटॅक किंवा इतर अनेक प्रकारचे अलर्ट मेसेज पाठवून माइक्रोसॉफ्ट टेक सपोर्टच्या नावाने लोकांना लुटायचे.

नोएडात 9 ठिकानी छापेमारी, 27 अटक

या प्रकरणात माइक्रोसॉफ्ट कंपनीकडून नोएडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात सांगितले की, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये अनेक ठिकाणी खोटे कॉल सेंटर चालवले जात आहेत, त्यामाध्यमातून विदेशी नागरिकांकडून रोज लाखों रूपये लुटले जात आहेत.

एसएसपी डॉ. अजयपाल यांनी सांगितले की, पोलिसांच्या 8 टीमच्या 50 पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणा छापेमारी करून 27 आरोपीना अटक केली आहे. आरोपींमध्ये बीबीए, एमबीए आणि बीटेक झालेले विद्यार्थी आहेत.

असा झाला भंडाफोड

हे सायबर गुन्हे करण्यासाठी माइक्रोसॉफ्टच्या खोट्या लोकांचा उपयोग व्यायचा. हेल्पलाइन नंबरसाठी अमेरिकेच्या व्हर्च्युअल नंबरला जनरेट करायचे. आणि लोकांना फसवायचे.

पेमेंटसाठी कोणी तयार झल्यावर पे-पाल किंवा दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे मागायचे. जेव्हा पाठवलेल्या पॉप-अपच्या आयपीचा तपास केला तेव्हा कळाले की, डोमेन आणि सर्वर भारतातील आहे. या आधारावर माइक्रोसॉफ्ट, एफबीआई आणि कॅनडा पोलिसांच्या मदतिने आरोपीपर्यंत पोहोचता आले.

Advertisement

देश

5 वर्षांचा चिमुरडा बनला एक दिवसाचा आमदार

Mahabatmi

Published

on

महोबा (उत्तर प्रदेश) | अभिनेता अनिल कपूरचा चित्रपट नायक तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटाच मुख्यमंत्र्याचे पात्र साकारणारे अमरेश पुरी अनिल कपूरला एका दिवसाचा मुख्यमंत्री बनवतात. असाच काहीसा प्रकार महोबाच्या चरखारी मतदार संघात झाला आहे. चरखारीचे आमदार ब्रजभूषण राजपूतने फिल्मी अंदाजात 5 वर्षाच्या मुलाला आमदार बमवले, आणि त्याला आपली गाड़ी, गनर आणि सचिव त्याच्या सोबत दिले. मुलानेही एका आमदाराप्रमाणे सगळ्या लोकांच्या समस्या ऐकल्या.

आपल्या अपंग मुलाला आमदार बनलेले पाहून त्याच्या आई-वडीलांना आनंदाश्रु अनावर झाले. त्या छोट्या आमदाराने पंचायतीत बसून लोकांच्या समस्या ऐकल्या, आणि त्यांचे अर्जही स्वीकारले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेले, जिथे पोलिस आधिकाऱ्याने त्या छोट्या आमदाराला त्यांच्या खुर्चीवर बसवले.

या छोट्या आमदाराचे नाव अरुण अहिरवार आहे. अरुण जन्मापासून बोलू शकत नाही. पण आपल्या मुलाला आमदार झालेल पाहून त्याचे आई-वडील खुप खुश झाले.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

December 2018
M T W T F S S
     
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.