Connect with us

देश

‘मोदीप्रेमा’तून एकत्र आलेले ‘ते’ दाम्पत्य विभक्त होण्याच्या मार्गावर..

Mahabatmi

Published

on

मुंबई– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमापोटी ‘लव्ह अॅट फेसबुक कमेंट’च्या माध्यमातून एकत्र आल्याचे सांगणार्‍या गुजरातमधील जय दवे आणि अल्पिका पांडे हे दाम्पत्य आता विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दोघांची लव्हस्टोरी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. मात्र, अल्पवधीत अल्पिता हिने पतीवर गंभीर आरोप केले आहे. पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे आरोप अल्पिताने केले आहेत.

जय आणि अल्पिता हे दोघे नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सोशल मीडियावर ट्रोल करता जय आणि अल्पिताचे प्रेम जुळले होते. नंतर दोघे 31 डिसेंबर 2018 ला विवाहाच्या बंधनात अडकले होते. मात्र, या दाम्पत्याच्या नात्यात आता दुरावा निर्माण झाला आहे. जय हा गुजरातमधील जामनगरचा रहिवासी आहे.विवाहाच्या अवघ्या एका महिन्यात अल्पिका पांडे हिने ट्विटरच्या माध्यमातून पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहे. पती शिवीगाळ करतो. तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करतो, असा आरोप अल्पिताने केला आहे.

जय मला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी देत नाही. माझ्यावर कायम संशय घेतो. एवढेच नाही तर मी बाथरुममध्ये काय करते, हे देखील त्यांना सांगावे लागतले. माझा फोन हिसकावून घेतला जातो. जयचे माझ्यावर खरंच प्रेम होते की, त्याने केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी लग्न केले याबाबत आता मला शंका येत आहे.एखादा मोदी भक्त भक्तीच्या नावाखाली पत्नीशी असेच वागतो का ?, असा सवाल अल्पिताने उपस्थित केला आहे.

‘नरेंद्र मोदीजी आम्ही तुमच्यामुळे विवाहबंधनात अडकलो. मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फेसबुक पेजवर मोदींच्या समर्थनार्थ कॉमेंट केली आणि त्यांच्या मतदारसंघातील या सुंदर युवतीने ती कमेंट लाईक केली. आम्ही बोललो. भेटलो आणि आम्ही दोघेही तुम्हाला समर्थन देत असल्याचे लक्षात आले. आम्हाला देशासाठी जगायचे आहे आणि म्हणूनच आम्ही ते एकत्र करण्याचे ठरवले,’ अशी पोस्ट जयने केली होती.

Advertisement

देश

पुलवामा:हल्लाच्या ठिकाणापासून 10 किलोमीटरवर राहत होता सुसाइड बॉम्बर

Mahabatmi

Published

on

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हत्यानंतर देशातील जनता आक्रोश करत आहे. दुसरीकडे, हल्ला घडवून अाणणारा सुसाइड बॉम्बर आदिल अहमद दारच्या कुटुं‍बीयांना मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या क्रूरकृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Continue Reading

देश

काश्मीर खोऱ्यात जैश ए महम्मदचे भीषण कृत्य,३९ जवान शहीद

Mahabatmi

Published

on

Continue Reading

देश

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 30 जवान शहीद

Mahabatmi

Published

on

श्रीनगर- जम्मूहून श्रीनगरला जाणार्‍या केंद्रीय राखव दलाच्या (सीआरपीएफ) 70 वाहनांच्या ताफ्याला काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी टार्गेट केले. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यात 2500 जवान होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद ऊर्फ वकास कमांडोने गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता हल्ला घडवून आणला.

पुलवामामधील अवंतीपुरात सीआरपीएफचा ताफा लेथपोरा येथून जात असतानाच दहशतवादी आदिल अहमद याने स्फोटकांनी भरलेल्या कारने जवानांच्या बसला धडक दिली. स्फोट होताच दुसर्‍या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत.

जैश-ए-मोहम्मदचा प्रवक्ता मुहम्मद हसन याने एका लोकल मीडियाशी बोलताना सांगितले की, सीआरपीएफच्या ताफ्यातील दोन बसेसला आम्ही टार्गेट केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी आमच्या संघटनेने स्विकारली आहे. आदिल अहमद ऊर्फ वकास कमांडोने हा हल्ला घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.