Connect with us

देश

पतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण

Mahabatmi

Published

on

मुंबई –  गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिकृतपणे रात्री 8.00 वाजता ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

Advertisement

देश

काँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण

Mahabatmi

Published

on

विरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Continue Reading

देश

निवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल

Mahabatmi

Published

on

नागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि
चाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत
दिला.

राफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.

नागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

Continue Reading

देश

पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला

Mahabatmi

Published

on

जम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in