Connect with us

देश

मुलीने दिला नवरदेवाला नकार, सासूबाई होणा-या जावायाला घेऊन झाला पसार

Mahabatmi

Published

on

कानपूर – उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात धक्कदायक घटना समोर आली आहे.  लग्नसमारंभात ऐनवेळी वधूने लग्नासाठी नकार दिला. सर्व काही सुरळीत होते. परंतु, वधूने होणाऱ्या पतीचा चेहरा पाहताच वरमाला फेकून दिली. तसेच आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. त्या मुलीच्या आईसह समस्त कुटुंबियांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने कुणाचे काहीच ऐकले नाही. मग, जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसेनासे झाले. मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर तिची आईच चक्क आपल्या होणाऱ्या जावयासोबत पसार झाली. ही घटना कानपूरच्या सचेंडी, भिसार गावात घडली आहे.

भिसार गावात एका 17 वर्षांच्या मुलीने नुकतीच 12 वीची परीक्षा दिली. तिच्या आईने तिचा विवाह आग्रा येथे राहणाऱ्या आपल्या चुलत नणदच्या मुलाशी निश्चित केला होता. 10 मार्च रोजी ठरल्याप्रमाणे नवरदेव वऱ्हाड घेऊन तिच्या घरी पोहोचला. परंतु, ऐनवेळी मुलीने लग्नास नकार दिला. आपल्याला जो फोटो दाखवून मंजुरी मिळवली तो दुसऱ्याच तरुणाचा होता. आता लग्नात आलेला माणूस आपल्यापेक्षा दुप्पट वयाचा असल्याचे तिने सांगितले. अशा स्वरुपाच्या फसवणुकीनंतर या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असे मुलीने स्पष्ट केले. लग्नमंडपात खूप मोठा वाद झाला. मुलगी लग्नाच्या मंडपातून बाहेर पडली. सगळेच तिला समजावून सांगत होते.

मुलीने नकार दिल्यानंतर लग्न रद्द करण्यात आले. सगळेच आप-आपल्या घरी निघाले. परंतु, दुसऱ्याच दिवशी मुलीच्या आईने सर्वांना धक्का दिला. ती आपल्या होणाऱ्या जावयासोबत आग्रा येथे पसार झाली. मुलीने सांगितल्याप्रमाणे, तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. ती घरातील सर्वात मोठी मुलगी होती. तिला एक भाऊ आणि बहिण सुद्धा आहेत. यानंतर नातेवाइकांनी चौकशी केली तेव्हा मुलीच्या आईलाच तो मुलगा पसंत होता असे समोर आले. आपल्या मुलीने नकार दिल्यानंतर तिला त्या मुलावर दया आली होती. त्याच दरम्यान तिने स्वतःच त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

देश

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

Mahabatmi

Published

on

पणजी | गोवा विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत (४६) गोव्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर सव्वाआठ तासांनी रात्री १.५० वाजता सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सावंत गोव्याचे ११ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा दिलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

रविवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घाजाराने निधान झाले. काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर सत्ताधारी भाजप आणि सहकारी पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर एकमत होत नव्हते. भाजपचा मित्र पक्ष महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते धवलीकर यांनी स्वतःचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी सूचविले होते. तर आणखी एका सहकारी पक्षाने आपला पाठिंबा पर्रिकरांना होता, भाजपला नाही अशा शब्दात भाजपची कोंडी केली होती. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.

Continue Reading

देश

पतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण

Mahabatmi

Published

on

मुंबई –  गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिकृतपणे रात्री 8.00 वाजता ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

Continue Reading

देश

मनोहर पर्रीकरांचं पार्थिव निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे रवाना

Mahabatmi

Published

on

मुंबई –  गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिकृतपणे रात्री 8.00 वाजता ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

मनोहर पर्रीकर अंत्ययात्रा कार्यक्रम – १८ मार्च २०१९

* स. ९.३० ते १०.३० –
पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप प्रदेश कार्यालयात

* स. १०.३० – कला अकादमी, पणजी

* स. ११ ते ४ : जनतेसाठी अंत्यदर्शन

* दु. ४ वाजता : SAG मैदान कंपाल इथपर्यंत अंत्ययात्रा येणार

* दू. ४.३० वाजता : SAG मैदान इथंच अंत्यविधी

* संध्या. ५ वाजता : अंत्यसंस्कार

पर्रीकर यांच्या निधनानंतर देशात दुखवटासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मनोहर पर्रिकरांचा प्रवास
13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतूनच झाले. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार होते.

मनोहर पर्रिकर यांनी सुरूवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले. तरूण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारणात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला. 1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.