Connect with us

देश

या सुंदर महिलेचे नेतेमंडळींसोबत कनेक्शन, होस्टेलमध्ये मुलींच्या आयुष्याशी खेळत होती, भाजप व काँग्रेस नेत्यांचे होते संरक्षण

Mahabatmi

Published

on

रतलाम – जावराच्या कुंदन कुटीर बालिकागृहाची संचालिका व माजी बालकल्याण समिती अध्यक्ष डॉ. रचना व तिचा पती ओमप्रकाश भारतीय यांनी आपल्या राजकीय ओळखीच्या बळावरच कुकर्म सुरू ठेवले होते. काँग्रेसी घराण्याच्या डॉ. रचनाची बालकल्याण समितीत नियुक्ती करण्याची शिफरसही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच केली होती. याच कारणामुळे सीएम कमलनाथ यांनी आता बालिकागृहात राजकीय हस्तक्षेप बंद करण्याची घोषणा केली आहे.

बालिकागृहातून मुली पळून गेल्याच्या आठ दिवसांनंतर आणि संचालिका डॉ. रचनासहित 4 जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाल्याच्या दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर जबाबदार अधिकारी आणि संस्थाचालकांवर कडक कारवाई करण्याचे म्हटले आहे. शनिवारी रात्री 8.42 वाजता करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सर्व सरकारी व खासगी बालिकागृह, छात्रावास, बालिका सुधारगृहांची सतत निगराणी व निरीक्षणाचे निर्देश दिले. ते म्हणाले की, कागदी व दिखाऊ निरीक्षणे सहन केली जाणार नाहीत. मागच्या सरकारच्या वेळी खासगी तसेच एनजीओद्वारे संचालित बालिकागृह व संस्थांची मनमर्जी संपुष्टात आणून राजकीय हस्तक्षेप बंद केला जाईल. अशा संस्थांचे सोशल ऑडिट करत तेथे राहणाऱ्या मुलींशी संवाद कायम केला जाईल.

बालिकागृहात वर्षभरापासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. दर महिन्याला निरीक्षण करण्यासाठी येणाऱ्या एका अधिकाऱ्याने याचा अहवालही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला परंतु त्यांनी प्रकरण दाबून ठेवले. 24 जानेवारी रोजी या 5 मुली पळून गेल्या नसत्या तर बहुधा या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाला नसता. दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत झालेल्या खुलाशानंतर अनेक अधिकारी चौकशीच्या रडारवर आले आहेत. चारही आरोपींच्या अटकेनंतर त्यांना पोलिस कोठडी मिळण्याऐवजी थेट तुरुंगात रवानगी झाल्याने लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कुंदन कुटीर बालिकागृह भाजप व काँग्रेस नेत्यांच्या संरक्षणाखाली सुरु होते. दारू पिऊन बालिकांना मारहाण करणारी संस्थापिका तसेच माजी बालकल्याण समिती अध्यक्ष डॉ. रचना भारतीयच्या मायाजालात दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे नेते अडकलेले होते. रचना माजी गृहमंत्री व वरिष्ठ काँग्रेसी नेते राहिलेले भारत सिंह यांचे खासगी सचिव एसएन ठक्कर यांची कन्या आणि माजी काँग्रेसी नपाध्यक्ष कुंदनमल भारतीय यांची सून आहे.

Advertisement

देश

पुलवामा:हल्लाच्या ठिकाणापासून 10 किलोमीटरवर राहत होता सुसाइड बॉम्बर

Mahabatmi

Published

on

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हत्यानंतर देशातील जनता आक्रोश करत आहे. दुसरीकडे, हल्ला घडवून अाणणारा सुसाइड बॉम्बर आदिल अहमद दारच्या कुटुं‍बीयांना मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या क्रूरकृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Continue Reading

देश

काश्मीर खोऱ्यात जैश ए महम्मदचे भीषण कृत्य,३९ जवान शहीद

Mahabatmi

Published

on

Continue Reading

देश

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 30 जवान शहीद

Mahabatmi

Published

on

श्रीनगर- जम्मूहून श्रीनगरला जाणार्‍या केंद्रीय राखव दलाच्या (सीआरपीएफ) 70 वाहनांच्या ताफ्याला काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी टार्गेट केले. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यात 2500 जवान होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद ऊर्फ वकास कमांडोने गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता हल्ला घडवून आणला.

पुलवामामधील अवंतीपुरात सीआरपीएफचा ताफा लेथपोरा येथून जात असतानाच दहशतवादी आदिल अहमद याने स्फोटकांनी भरलेल्या कारने जवानांच्या बसला धडक दिली. स्फोट होताच दुसर्‍या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत.

जैश-ए-मोहम्मदचा प्रवक्ता मुहम्मद हसन याने एका लोकल मीडियाशी बोलताना सांगितले की, सीआरपीएफच्या ताफ्यातील दोन बसेसला आम्ही टार्गेट केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी आमच्या संघटनेने स्विकारली आहे. आदिल अहमद ऊर्फ वकास कमांडोने हा हल्ला घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.