Connect with us

देश

#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं

Mahabatmi

Published

on

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 हून जास्त जवान शहीद झाल्याच्या अवघ्या 12 दिवसांमध्येच भारताने पाकिस्तानाला चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्यात ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे पाकिस्ताननेही हल्ला झाल्याचं मान्य केलं आहे, पण कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.

जाणून घ्या गेल्या 11 दिवसात काय घडलं –  

  • 15 फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेचे एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी एअर स्ट्राइकचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सरकारकडून तातडीने मंजुरी देण्यात आली.
  • 16 ते 20 फेब्रुवारी – यानंतर भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराने हेरॉन ड्रोनच्या आधारे नियंत्रण रेषेवर(एलओसी) टेहाळणी सुरू केली.
  • 20-22 फेब्रुवारी – या दरम्यान भारतीय वायुसेना आणि गुप्तचर संस्थांनी हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठी संभाव्य ठिकाणं निश्चित केली.
  • 21 फेब्रुवारी – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमोर हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठीच्या संभाव्य ठिकाणांबाबत माहिती देण्यात आली आणि हल्ला(स्ट्राइक) करण्यासाठीचं लक्ष निश्चित करण्यात आलं.
  • 22 फेब्रुवारी – भारतीय वायुसेनेच्या 1 स्क्वाड्रन ‘टायगर्स’ आणि 7 स्क्वाड्रन ‘बॅटल अॅक्सिस’ला हल्ल्याच्या मोहिमेसाठी ( स्ट्राइक मिशन) सज्ज करण्यात आली. याशिवाय मोहिमेसाठी दोन मिराज स्क्वाड्रनमधील 12 जेट निवडण्यात आले.
  • 24 फेब्रुवारी : पंजाबच्या भटिंडा येथून वॉर्निंग जेट आणि उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून विमानात हवेत इंधन भरण्याचा सराव करण्यात आला.
  • 25 फेब्रुवारी – या दिवशी ऑपरेशन सुरू करण्यासाठी 12 मिराज विमानं तयार करण्यात आली. स्ट्राइक करण्याआधी मिराजच्या वैमानिकांनी लक्ष्य निश्चीत केलं. पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये लेझर गाइडेड बॉम्बद्वारे (लक्ष्य अचूक साधणारे बॉम्ब) हल्ला करण्यात आला. रात्री 3.20 ते 4 वाजेदरम्यान ही कारवाई फत्ते करण्यात आली.
  • 26 फेब्रुवारी – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोहीम फत्ते झाल्याबाबत माहिती दिली.
Advertisement

देश

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

Mahabatmi

Published

on

पणजी | गोवा विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत (४६) गोव्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर सव्वाआठ तासांनी रात्री १.५० वाजता सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सावंत गोव्याचे ११ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा दिलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

रविवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घाजाराने निधान झाले. काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर सत्ताधारी भाजप आणि सहकारी पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर एकमत होत नव्हते. भाजपचा मित्र पक्ष महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते धवलीकर यांनी स्वतःचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी सूचविले होते. तर आणखी एका सहकारी पक्षाने आपला पाठिंबा पर्रिकरांना होता, भाजपला नाही अशा शब्दात भाजपची कोंडी केली होती. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.

Continue Reading

देश

पतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण

Mahabatmi

Published

on

मुंबई –  गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिकृतपणे रात्री 8.00 वाजता ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

Continue Reading

देश

मनोहर पर्रीकरांचं पार्थिव निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे रवाना

Mahabatmi

Published

on

मुंबई –  गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिकृतपणे रात्री 8.00 वाजता ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

मनोहर पर्रीकर अंत्ययात्रा कार्यक्रम – १८ मार्च २०१९

* स. ९.३० ते १०.३० –
पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप प्रदेश कार्यालयात

* स. १०.३० – कला अकादमी, पणजी

* स. ११ ते ४ : जनतेसाठी अंत्यदर्शन

* दु. ४ वाजता : SAG मैदान कंपाल इथपर्यंत अंत्ययात्रा येणार

* दू. ४.३० वाजता : SAG मैदान इथंच अंत्यविधी

* संध्या. ५ वाजता : अंत्यसंस्कार

पर्रीकर यांच्या निधनानंतर देशात दुखवटासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मनोहर पर्रिकरांचा प्रवास
13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतूनच झाले. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार होते.

मनोहर पर्रिकर यांनी सुरूवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले. तरूण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारणात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला. 1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.