Connect with us

देश

हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू

Mahabatmi

Published

on

नवी दिल्ली – करोलबाग येथील गुरुद्वारा रॉड स्थित हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे साडेचार वाजता लागलेल्या आगीमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश लोकांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तीन लोकांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये एकाच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत.

Advertisement

देश

साध्वींनी भरला उमेदवारी अर्ज

Avatar

Published

on

By

भोपाळ – लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भोपाळ लोकसभा मतदार संघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. साध्वींनी शुभ मुहूर्त पाहून गुफा मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर पंडितांच्या उपस्थितीत स्वस्तिवाचन मंत्रोच्चार करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. परंतु, आरोग्याच्या समस्या असल्यामुळे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढण्यात अडचणी आल्या. त्यामुळे फॉर्म भरला तरीही तो दाखल करण्यासाठी त्या पुन्हा मंगळवारी कार्यालय गाठतील. सोबतच, मंगळवारी त्यांचे अर्ज भरण्याची व्यवस्था खालच्या मजल्यावरच करण्यात यावे अशी विनंती सुद्धा साध्वींचे प्रस्तावक उमाशंकर गुप्ता यांनी केली आहे.

Continue Reading

देश

प्रज्ञा साध्वींचे धक्कादायक वक्तव्य – करकरेंना माझा शाप होता

Avatar

Published

on

By

भोपाळ – भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. साध्वी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. उमेदवारी भेटल्यानंतर एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

एका सभेत साध्वी म्हणाली, ‘तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितले होते. पण हेमंत करकरेंनी मात्र नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असे म्हटले होते’

करकरेंनी मला शिव्या दिल्या होत्या. तुझा नायनाट होईल असे मी म्हटले होते. ज्यावेळी मी गेले तेव्हापासून सूतक लागलं होतं, पण दहशतवाद्यांना त्यांना मारलं तेव्हा माझं सूतक संपलं, असं संतापजनक विधान साध्वी प्रज्ञाने केलं. साध्वी प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे

Continue Reading

देश

काँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण

Mahabatmi

Published

on

विरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in