चेन्नई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईतील डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटनाला पोहचले परंतु विमानतळावर पोहचताच स्थानिकांनी त्यांच्याविरोधात चले जावची घोषणाबाजी केली. तसेच काहींनी काळे झेंडे दाखवले. दरम्यान, सकाळी नऊ वाजल्यापासून तामिळ लोकांनी मोदींविरोधात टि्वटवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड करायला सुरूवात केली. सुरूवातीला चेन्नईत, नंतर देशभर व शेवटी वर्ल्डवाईड #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये टॉपला गेला. अनेकांनी मोदींविरोधात टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तामिळनाडू व कर्नाटक यांच्यात कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून वाद सुरू आहे. कावेरी प्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय दिला होता. त्यात कर्नाटकला जास्तीचे पाणी तर तामिळनाडूच्या वाट्याला कमी आले बोते. त्यामुळे तामिळनाडूच्या जनतेत रोष आहे.