Connect with us

मुंबई पुणे नाशिक

पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना ११० कोटी देणारा व्यक्ती, कोण आहे जाणून घ्या

Mahabatmi

Published

on

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी देशभरातून मदतीचे प्रस्ताव येत आहेत. उद्योग आणि खासगी क्षेत्रांसह नोकरीपेशातील व्यक्ती सुद्धा आपल्या कमाईचा काही भाग या शहीदांच्या कुटुंबियांना समर्पित करत आहेत. यापैकीच एक राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील वैज्ञानिक आणि उद्योजक मुर्तुझा अली यांनी शहीदांच्या वारसांना 110 कोटी रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुर्तुझा अली ही रक्कम पंतप्रधान मदत निधीला सुपूर्द करणार आहेत. ते सध्या मुंबईत कार्यरत असून त्यांनी पंतप्रधान कार्यालयास या निमित्त एक पत्र पाठवले. तसेच मोदींना भेटीसाठी वेळ मागितला. त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून सकारात्मक उत्तर मिळाले आहे.

मुर्तुझा अली पंतप्रधान मदत निधीला 110 कोटींचा चेक देणार आहेत. यासाठी त्यांनी संपूर्ण कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील विनंती करणारा एक पत्र पंतप्रधान कार्यालयास ई-मेलच्या माध्यमातून पाठवला होता. यामध्ये त्यांनी मागितलेल्या भेटीच्या प्रस्तावास पीएमओने होकार दिला आहे. मुर्तुझा अली जन्मापासूनच नेत्रहीन आहेत. त्यांना कोटा येथील वाणिज्य महाविद्यालयातून पदी घेतली. त्यांचे ऑटोमोबाईलचे कौटुंबिक बिझनेस आहे. मुर्तुझा एक नावाजलेले वैज्ञानिक सुद्धा आहेत. फ्यूल बर्न रेडिएशन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून जीपीएस, कॅमेरा आणि इतर उपकरणांशिवाय कुठल्याही वाहनाला ट्रेस करणाऱ्या उपकरणाचा त्यांनी शोध लावला आहे. ते सध्या मुंबईत कार्यरत आहेत.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश

Mahabatmi

Published

on

कळवण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांपासून तयारी करत असलेल्या डॉ. पवार यांना उमेदवारी नाकारून राष्ट्रवादीने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देऊन युतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, यामुळे डॉ. पवार नाराज झाल्या होत्या. त्यांच्या या नाराजीचा फायदा पालकमंत्री महाजन व भाजपचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेऊन डॉ. पवार यांची भेट घेत भाजपमध्ये या, तुमचा सन्मान करू, असे सांगून राष्ट्रवादीला कोंडीत पकडले. मात्र, डॉ. पवार यांनी आपण भाजपमध्ये येऊ पण उमेदवारी पाहिजेच असा आग्रह कायम ठेवला. त्यामुळे त्यांचा बुधवारचा प्रवेश लांबला होता. यावर भाजपची वरिष्ठ समिती, मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री महाजन यांच्यात चर्चा झाली आणि त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे कळते.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई

Avatar

Published

on

By

मुंबई । लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर अातापर्यंत ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अायाेगाकडून देण्यात आली.

ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनरसंदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.

 

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त

Mahabatmi

Published

on

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या शैक्षणिक ट्रस्टची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेने ट्रस्ट आणि ट्रस्टचे गॅरेंटर यांना दोन महिन्याच्या आत कर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत.

कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टवर बँक आॅफ महाराष्ट्रचे १६ कोटी, स्टेट बँक आॅफ इंडियाचे ३८.६३ कोटी आणि बँक आॅफ इंडियाचे १३.१८ कोटी इतके कर्ज आहे. मात्र कर्ज थकविल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकेकडून या ट्रस्टची कुर्ला आणि खंडाळा येथील संपत्ती जप्त केल्याची माहिती हाती येत आहे. यामध्ये जमीन आणि दोन इमारतींचा समावेश आहे. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टसह मनोहर जोशी यांचा मुलगा आणि गॅरेंटर उन्मेश जोशी, त्यांच्या पत्नी माधवी जोशी तसेच कॉर्पोरेट गॅरेंटर हॉटेल एअरपोर्ट कोहिनूर आणि कोहिनूर प्लेनट कन्सट्रकशन यांना हा निर्देश देण्यात आले आहेत.उन्मेश जोशी यांनी शिवसेनाभवन समोर कोहिनूर सक्वेअर हा प्रोजेक्ट सुरू केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम बंद होते. ९०० कोटींचे कर्ज न फेडल्याने जोशी यांच्या हातून ‘कोहिनूर’ प्रकल्प निसटला आहे. दादरमधील एका आर्कीटेक्ट कंपनीने या प्रोजेक्टचे काम हाती घेतले आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.