Connect with us

मुंबई पुणे नाशिक

तुकाराम मुंढे यांची एका महिन्यात मंत्रालयातूनही उचलबांगडी

Mahabatmi

Published

on

Tukaram Mundhe transferred again, this time as project head of state AIDS body

मुंबई | कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या एका महिन्यात मंत्रालयातून उचलबांगडी करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्तपदावरून मुंडे यांची 21 नोव्हेंबरला मंत्रालयात नियोजन आयोगाच्या सहसचिवपदी बदली करण्‍यात आली होती. या पदाचा कार्यभार स्विकारून मुंडे यांना एक महिना होत असतानाच त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता मुंडे यांची एड्‍स नियंत्रण प्रकल्प संचालकपदी बदली करण्‍यात आली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंडे यांच्यासह राज्यातील चार आयएएस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. रुबल अगरवाल यांच्याकडे पुणे महापालिका आयुक्त तसेच शिर्डी साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. शितल उगले यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच अतिरिक्त पदभार आणि विदर्भ वैधाणिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी तर बालाजी मंजुळे यांची पुणे अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई

Avatar

Published

on

By

मुंबई । लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर अातापर्यंत ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अायाेगाकडून देण्यात आली.

ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनरसंदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.

 

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त

Mahabatmi

Published

on

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या शैक्षणिक ट्रस्टची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेने ट्रस्ट आणि ट्रस्टचे गॅरेंटर यांना दोन महिन्याच्या आत कर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत.

कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टवर बँक आॅफ महाराष्ट्रचे १६ कोटी, स्टेट बँक आॅफ इंडियाचे ३८.६३ कोटी आणि बँक आॅफ इंडियाचे १३.१८ कोटी इतके कर्ज आहे. मात्र कर्ज थकविल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकेकडून या ट्रस्टची कुर्ला आणि खंडाळा येथील संपत्ती जप्त केल्याची माहिती हाती येत आहे. यामध्ये जमीन आणि दोन इमारतींचा समावेश आहे. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टसह मनोहर जोशी यांचा मुलगा आणि गॅरेंटर उन्मेश जोशी, त्यांच्या पत्नी माधवी जोशी तसेच कॉर्पोरेट गॅरेंटर हॉटेल एअरपोर्ट कोहिनूर आणि कोहिनूर प्लेनट कन्सट्रकशन यांना हा निर्देश देण्यात आले आहेत.उन्मेश जोशी यांनी शिवसेनाभवन समोर कोहिनूर सक्वेअर हा प्रोजेक्ट सुरू केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम बंद होते. ९०० कोटींचे कर्ज न फेडल्याने जोशी यांच्या हातून ‘कोहिनूर’ प्रकल्प निसटला आहे. दादरमधील एका आर्कीटेक्ट कंपनीने या प्रोजेक्टचे काम हाती घेतले आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

वरळी समुद्रात बोट बुडाली

Mahabatmi

Published

on

मुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एकजण बेपत्ता असून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी समुद्रात दुपारी रेवती नावाची बोट बुडाल्याची घटना घडली. या घटनेत बोटीतील एक प्रवासी बेपत्ता असल्याचे समजते. तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या तटरक्षक दलाच्या जवानांनी सहा ते सात प्रवाशांना वाचविले आहे. याचबरोबर, तटरक्षक दलाचे जवान बेपत्ता असलेल्या एका प्रवासाचा शोध हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने घेत आहेत.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.