Connect with us

मुंबई पुणे नाशिक

व्यापाऱ्याचे अपहरण करुन बेदम मारहाण, 50 लाखाची मागितली खंडणी

Mahabatmi

Published

on

Kalyan

कल्याण | उल्हासनगरमध्ये दहशत माजविणारा कुख्यात गुंड माजी आमदार पप्पू कलानी जेलमध्ये आहे. आत्ता त्याचा मुलगा ओमी कलानी पप्पूचा वारसा चावित असल्याची गंभीर बाब एका घटनेतून समोर आली आहे. त्याच्यावर एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याला कोंडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हे त्याने पन्नास लाखाच्या खंडणीसाठी केले आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असुन एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

एकेकाळी उल्हासनगर मध्ये कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंड पप्पू कलानी याची प्रचंड दहशत होती. पप्पू हा एका हत्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र त्याची पत्नी ज्योती कलानी ही राष्ट्रवादीची आमदार आहे. तर कलानी यांची सून पंचम कलानी ही उल्हासनगरात महापौर आहे. भाजपच्या कृपा आशीर्वादाने महापौर बनली आहे. ओमी कलानी हा येत्या विधानसभा निवडणूकीत भाजपतर्फे आमदारीकी निवडणूक लढविण्याच्या बेतात आहे. त्यासाठी त्याने टिम ओमी कलानी तयार केली आहे. त्याच टीमच्या माध्यमातून त्याने नवा उद्योग सुरु केलाय.खाण तशी माती या म्हणी प्रमाणे ओमीने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल देत एका व्यापाऱ्या कडे 50 लाखाची खंडणी मागितली. त्याचे अपहरण करुन त्याला मारहाण केली. त्याला एक खोलीत कोंडून ठेवले. त्याच्या साथीदारासह त्याने हा प्रताप केला आहे. ओमीसह त्याच्या आठ साथीदारांच्या विरोधात खंडणी, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापाऱ्याचे नाव अनिल कांजानी आहे.अनिल कांजानी आणि अहमदाबादचा व्यापारी सुरेश लालवाणी यांच्यात पैशाची देवाणघेवाण आहे. अनिलला काल काही लोकांनी मुंबई विमानतळावर नेले. त्याठिकाणी सुरेश लालवाणी आला होता. तो पुन्हा अहमदाबादला निघून गेला. अनिल परत कल्याण पूव्रेतील आपल्या दुकानात आला. दुकानात बसलेल्या अनिलला ओमीच्या साथीदारांनी विठ्ठलवाडी येथील प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नेले. त्याला मारहाण केली. तिथून त्याला सिमा रिसॉर्टमध्ये नेले. सिमा रिसॉर्ट हे कलानीच्या मालकीचे आहे. त्याठिकाणीही त्याला मारहाण करण्यात आली. तीन दिवसात पन्नास लाख रुपये दे आणि बाकीचे पैसेही लवकर दे अन्यथा तुझ्या कुटुंबाला संपवू अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला सोडून दिले. अनिलची सुटका झाल्यावर त्याने कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून रितसर तक्रार दिली. पोलिसांनी ओमी कलानीसह सुरेश लालवाणी, निलेश, सनी तेलकर, विकी पंजाबी, विजय शिंदे, संतोष पांडे, कमलेश निकम, गुड्ड रॉय व अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी सनी तेलकर ला अटक केली आहे. पुढील तपास सुरु असुन पोलिस या प्रकरणात काही एक माहिती देत नाहीत. अनिल या घटनेचा मानसिक त्रस झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

  • ओमी कलानीने फेटाळले आरोप

लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपला असून प्रत्येक निवडणूक मध्ये असच माझा व माझा कुटुंबावर राजकीय दबाव आणून हल्ला केला जातो, या प्रकरणी ओमी कलानी यांचा अस म्हणणं आहे की राजकीय दबाव आणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, माझ्यावर हा गुन्हा बनावट आहे, मी घाबरणार नाही, आणि मी सुद्धा पोलिसांना सखोल चौकशी ची मागणी केली आहे.

@गौतम वाघ

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश

Mahabatmi

Published

on

कळवण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांपासून तयारी करत असलेल्या डॉ. पवार यांना उमेदवारी नाकारून राष्ट्रवादीने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देऊन युतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, यामुळे डॉ. पवार नाराज झाल्या होत्या. त्यांच्या या नाराजीचा फायदा पालकमंत्री महाजन व भाजपचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेऊन डॉ. पवार यांची भेट घेत भाजपमध्ये या, तुमचा सन्मान करू, असे सांगून राष्ट्रवादीला कोंडीत पकडले. मात्र, डॉ. पवार यांनी आपण भाजपमध्ये येऊ पण उमेदवारी पाहिजेच असा आग्रह कायम ठेवला. त्यामुळे त्यांचा बुधवारचा प्रवेश लांबला होता. यावर भाजपची वरिष्ठ समिती, मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री महाजन यांच्यात चर्चा झाली आणि त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे कळते.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई

Avatar

Published

on

By

मुंबई । लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर अातापर्यंत ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अायाेगाकडून देण्यात आली.

ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनरसंदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.

 

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त

Mahabatmi

Published

on

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या शैक्षणिक ट्रस्टची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेने ट्रस्ट आणि ट्रस्टचे गॅरेंटर यांना दोन महिन्याच्या आत कर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत.

कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टवर बँक आॅफ महाराष्ट्रचे १६ कोटी, स्टेट बँक आॅफ इंडियाचे ३८.६३ कोटी आणि बँक आॅफ इंडियाचे १३.१८ कोटी इतके कर्ज आहे. मात्र कर्ज थकविल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकेकडून या ट्रस्टची कुर्ला आणि खंडाळा येथील संपत्ती जप्त केल्याची माहिती हाती येत आहे. यामध्ये जमीन आणि दोन इमारतींचा समावेश आहे. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टसह मनोहर जोशी यांचा मुलगा आणि गॅरेंटर उन्मेश जोशी, त्यांच्या पत्नी माधवी जोशी तसेच कॉर्पोरेट गॅरेंटर हॉटेल एअरपोर्ट कोहिनूर आणि कोहिनूर प्लेनट कन्सट्रकशन यांना हा निर्देश देण्यात आले आहेत.उन्मेश जोशी यांनी शिवसेनाभवन समोर कोहिनूर सक्वेअर हा प्रोजेक्ट सुरू केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम बंद होते. ९०० कोटींचे कर्ज न फेडल्याने जोशी यांच्या हातून ‘कोहिनूर’ प्रकल्प निसटला आहे. दादरमधील एका आर्कीटेक्ट कंपनीने या प्रोजेक्टचे काम हाती घेतले आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.