Connect with us

मुंबई पुणे नाशिक

राज ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर

Mahabatmi

Published

on

Raj-Thackeray

मुंबई | लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. परंतु, या कटाबद्दल आपण आधीच बोललो होतो, राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरयांनी आज लगावला.

‘राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवायची आणि समाजात भय निर्माण करायचे. त्यातून पुन्हा सत्ता मिळवायची, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पुण्यातील सभेत केला होता. नेमका हाच विषय राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील सभेत मांडला.

ओवैसी बंधूंच्या मदतीने राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लिम दंगलीचा कट रचला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यावरून शिवसेनेनं आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी राज यांची खिल्ली उडवलीय. आता प्रकाश आंबेडकर यांनीही राज यांच्यावर ‘कॉपी’चा शिक्का मारलाय. त्यामुळे आता राज ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्यातही खटका उडू शकतो.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

डॉन अरुण गवळीला संचित पॅरोल मंजूर

Mahabatmi

Published

on

मुंबई- गुन्हेगारी जगातातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला संचित रजा (पॅरोल) मंजूर झाली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यानंतर 30 एप्रिलला गवळी मुंबईला परतणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली.

अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. याआधीही 2 ते 3 वेळा अरुण गवळी जेलबाहेर आला आहे. मुलाचे लग्न, आजारपण अशी कारणे देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता. आता पुन्हा अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहा बाहेर येणार आहे.

गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्याप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसच्या पदयात्रांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahabatmi

Published

on

loksabha election 2019 getting-a-good-response-to-congressional-conferences-in-south-central-mumbai

मुंबई | दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्या पदयात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्तप्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी मतदारांची साफ निराशा केल्याने पुन्हा एकदा गायकवाड यांनाच निवडून देण्याची गरज ठिकठिकाणच्या मतदारांकडून व्यक्त होत आहे.गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीतल्या मोदी लाटेत अनेक अननुभवी उमेदवार संसदेत गेले. मात्र अनुभवाची कमतरता आणि सामाजिक भान नसल्याने त्यातले अनेक जण आपला प्रभाव पाडू शकले नाहीत.

दक्षिण मध्यमुंबई मतदारसंघातून निवडून गेलेल्या शिवसेनेच्या राहूल शेवाळेंनाही संसदेच्या कामकाजात आपला प्रभाव पाडता आला नाही. गेल्या पाच वर्षांत ‘मौनी खासदार’ अशी त्यांची ओळख झाली असून मतदारसंघातही ते दिसतनसल्याची मतदारांची तक्रार आहे. ही बाब काँग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांच्या चांगलीच पथ्यावर पडली असून मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असताना त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केलेजात आहे.

याशिवाय काँग्रेसच्या बाईक रॅली आणि रोड शोजमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत असून त्यात तरूणांचे प्रमाण लक्षणिय आहे. गेल्या पाच वर्षांतल्या शिवसेनेच्या अपयशाचा पाढाच हे मतदारत्यांच्यासमोर वाचत असून पुन्हा एकदा काँग्रेसलाच संधी देण्याचा मनोदय मतदारांद्वारे व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या या चौफेर प्रचारामुळे विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Continue Reading

देश

प्रज्ञा साध्वींचे धक्कादायक वक्तव्य – करकरेंना माझा शाप होता

Avatar

Published

on

By

भोपाळ – भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. साध्वी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. उमेदवारी भेटल्यानंतर एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

एका सभेत साध्वी म्हणाली, ‘तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितले होते. पण हेमंत करकरेंनी मात्र नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असे म्हटले होते’

करकरेंनी मला शिव्या दिल्या होत्या. तुझा नायनाट होईल असे मी म्हटले होते. ज्यावेळी मी गेले तेव्हापासून सूतक लागलं होतं, पण दहशतवाद्यांना त्यांना मारलं तेव्हा माझं सूतक संपलं, असं संतापजनक विधान साध्वी प्रज्ञाने केलं. साध्वी प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in