Connect with us

मुंबई पुणे नाशिक

‘उत्तर भारतीय पंचायतला मनसेकडून उमेदवारी?

Mahabatmi

Published

on

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. अशा वातावरणात मनसे चुप्पी साधून आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, लढवली तर उमेदवार कोण असतील? याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. अशात ‘उत्तर भारतीय महापंचायत’चे अध्यक्ष विनय दुबे यांनी त्यांना मनसेकडून कल्याण मतदार संघाची उमेदवारी मिळावी म्हणून राज यांच्याकडे साकडं घातलं असल्याची माहिती हाती येत आहे. मात्र मनसे दुबेला उमेदवारी देण्यास इच्छुक नसल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते आहे.

उत्तर भारतीय समाज आणि मराठींमध्ये असलेला वाद, गैरसमज मिटावे यासाठी ‘उत्तर भारतीय महापंचायत’चे अध्यक्ष विनय दुबेने राज यांची भेट घेतली होती. राज यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधावा यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. राज यांनी हे आमंत्रण स्विकारत उत्तर भारतीयांशी संवादही साधला होता. मात्र आता दुबेने मनसेकडे थेट त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी राज यांची भेट घेतली असल्याचे समजते आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघात उत्तरभारतीय समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मनसेकडून उमेदवारी मिळावी अशी दुबेची अपेक्षा आहे. न मिळाल्यास दुबे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश

Mahabatmi

Published

on

कळवण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांपासून तयारी करत असलेल्या डॉ. पवार यांना उमेदवारी नाकारून राष्ट्रवादीने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देऊन युतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, यामुळे डॉ. पवार नाराज झाल्या होत्या. त्यांच्या या नाराजीचा फायदा पालकमंत्री महाजन व भाजपचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेऊन डॉ. पवार यांची भेट घेत भाजपमध्ये या, तुमचा सन्मान करू, असे सांगून राष्ट्रवादीला कोंडीत पकडले. मात्र, डॉ. पवार यांनी आपण भाजपमध्ये येऊ पण उमेदवारी पाहिजेच असा आग्रह कायम ठेवला. त्यामुळे त्यांचा बुधवारचा प्रवेश लांबला होता. यावर भाजपची वरिष्ठ समिती, मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री महाजन यांच्यात चर्चा झाली आणि त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे कळते.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई

Avatar

Published

on

By

मुंबई । लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर अातापर्यंत ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अायाेगाकडून देण्यात आली.

ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनरसंदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.

 

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त

Mahabatmi

Published

on

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या शैक्षणिक ट्रस्टची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेने ट्रस्ट आणि ट्रस्टचे गॅरेंटर यांना दोन महिन्याच्या आत कर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत.

कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टवर बँक आॅफ महाराष्ट्रचे १६ कोटी, स्टेट बँक आॅफ इंडियाचे ३८.६३ कोटी आणि बँक आॅफ इंडियाचे १३.१८ कोटी इतके कर्ज आहे. मात्र कर्ज थकविल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकेकडून या ट्रस्टची कुर्ला आणि खंडाळा येथील संपत्ती जप्त केल्याची माहिती हाती येत आहे. यामध्ये जमीन आणि दोन इमारतींचा समावेश आहे. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टसह मनोहर जोशी यांचा मुलगा आणि गॅरेंटर उन्मेश जोशी, त्यांच्या पत्नी माधवी जोशी तसेच कॉर्पोरेट गॅरेंटर हॉटेल एअरपोर्ट कोहिनूर आणि कोहिनूर प्लेनट कन्सट्रकशन यांना हा निर्देश देण्यात आले आहेत.उन्मेश जोशी यांनी शिवसेनाभवन समोर कोहिनूर सक्वेअर हा प्रोजेक्ट सुरू केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम बंद होते. ९०० कोटींचे कर्ज न फेडल्याने जोशी यांच्या हातून ‘कोहिनूर’ प्रकल्प निसटला आहे. दादरमधील एका आर्कीटेक्ट कंपनीने या प्रोजेक्टचे काम हाती घेतले आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.