Connect with us

मुंबई पुणे नाशिक

मुंबईत २६ हजारांपेक्षा जास्त मुलं बेपत्ता

Mahabatmi

Published

on

मुंबई | २०१३ पासून आजपर्यंत मुंबई महानगरात २६ हजारांपेक्षा मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या आकडेवारीनुसार जवळपास २२०० मुलींचा यात समावेश आहे. या बेपत्ता मुलींचा अद्यापही पत्ता लागलेले नाही.

दरम्यान, विधानसभेत मंगलप्रसाद लोढा आणि अन्य आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेपत्ता मुलांच्या संदर्भात सभागृहात माहिती दिली.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

कंत्राटी कर्मचाऱ्यांची वारी न्यायहक्कांसाठी विधानसभेच्या दारी

Mahabatmi

Published

on

long-march-of-contract-workers-from-nashik-to-mumbai-legislature

नाशिक | राज्यातील सर्व आस्थापनेवरील व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी यांना कायम समायोजन करण्यात यावे असा निर्णायक आंदोलन म्हणून 52 संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या नाशिक ते मुंबई विधानभवन लाँग मार्च होणार असल्याची माहिती अध्यक्ष मुकूंद जाधवर यांनी नाशिक येथील श्री चिंतामणी मंगल कार्यालय येथे घोषित केले आहे.

यावेळी अध्यक्ष जाधवर म्हणाले की, गेली अनेक वर्षे कंत्राटी कर्मचारी शासनाला सेवा देत आहे. शासन आम्हाला फक्त वापरून सोडून देत आहे. केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध योजनांवर कंत्राटी कर्मचारीच राबवत आहे. प्रशासन जाणूनबुजून काना डोळा करत आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, कामगार मंत्री, रोजगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव यांना कंत्राटी कर्मचारी यांच्या अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही.

शासकीय कंत्राटी कर्मचारी अत्यंत अत्यल्प मानधनावर तसेच कुठलीही सामाजिक सुरक्षितता राज्य शासनाने दिलेली नसताना कार्यरत आहेत राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबत अद्याप कुठलीही भूमिका घेतलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन तसेच रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम करणेबाबत निकाल दिलेले असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागण्याचा शासन विचार करत नसल्यामुळे “कंत्राटी कर्मचाऱ्यांची वारी न्यायहक्कांसाठी विधानसभेच्या दारी” यानुसार आपला प्रश्न राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी सोडवावेत यासाठी नाशिक ते मुंबई विधानभवन लाँग मार्च दि. 23 फेब्रुवारी ला नाशिक येथून सुरु होऊन दि. 26 फेब्रुवारी रोजी मुंबई विधानभवन येथे धडकणार आहे. असे म.रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर यांनी सांगितले.

दरम्यान मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, संपूर्ण राज्यात 05 लाख कंत्राटी कर्मचारी आज मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व विभागात काम करत आहे. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. वर्षानुवर्षे त्यांना कामाचा अनुभव सुद्धा आला आहे. जर हेच कंत्राटी कर्मचारी परमनंट केले तर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागणार नाही त्यामुळे राज्य शासनाचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच दि. 31 डिसेंबर 2018 पर्यंत सर्व आस्थापनेवरील व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम समायोजन करावे अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे मुलाणी म्हणाले.

यासाठी सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी संघटना, म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या व आयटक च्या नेत्रत्वात नाशिक ते मुंबई लाँग मार्च चे नियोजन करण्यात महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आव्हान आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले तसेच महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी केली आहे.

यावेळी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकुंद जाधवर, आयटक चे विजय कांबळे, सरचिटणीस शहाजी नलवडे, कार्याध्यक्ष सचिव जाधव, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, प्रवक्ते भगवान भगत, महिला अध्यक्ष माधुरी थोरात आदी उपस्थित होते.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

अभाविप द्वारे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात मुंबईत तीव्र आंदोलन

Mahabatmi

Published

on

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जम्मू कश्मीर येथील पुलावामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत, तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केले. अभाविप या दुःखाच्या परिस्थितित शहीद जवानांच्या कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2234829070112946&id=1784070418522149

अभाविपची मागणी आहे की या हल्ल्यात शहिदांचा बलिदान व्यर्थ न जाता, जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटन जैश -ए- मोहम्मद विरोधात त्वरित कारवाई केली पहिजे.

अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पित करताना सांगितले की ‘दहशतवाद हा देशासाठी एक मोठे आव्हान असून संपूर्ण राष्ट्रकरिता हे खूपच दुःखदायक आहे. सरकारने या विषयात त्वरित कारवाई केली पाहिज.ज्यामुळे शहीदांना न्याय मिळू शकेल. तसेच काही राजकीय पक्ष या विषयावर वोट बैंकचा खेळ खेळत आहेत. अश्या लोकांचा अभाविप निषेध करते आणि त्यांना आवाहन करते की, हा एक गंभीर विषय असून याचे राजकारण करू नये.

अभाविपचे कोंकण प्रांत मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पित केले. ‘शहीदांना लवकरच न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. तसेच अभाविप कोंकण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध केले. जितेंद्र आव्हाड यांनी आज एका वृत्तवाहिनीवर ,’पुलवामा हल्ला हा मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक’ असे सांगितले. जितेंद्र आव्हाड यानी केलेल्या विधानाचा अभाविप विरोध केले. तसेच यातून सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

Continue Reading

क्राईम

वेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या

Mahabatmi

Published

on

मुंबई | माहीम परिसरातील एल जे. रोडवर काल मध्यरात्री अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. वेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या रस्त्यावरील कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रस्त्यावर आई वडिलांसोबत झोपलेल्या पाच वर्षीय मुलीला एका अज्ञात नराधमाने पळवून नेले. तिचे लैंगिक शोषण करून तिचा हत्या करून पळ काढला. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात पॉक्सो आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.