Connect with us

मुंबई पुणे नाशिक

खुशखबर ! एसटीत वाहक चालकांची ४ हजार २४२ पदांची भरती

Mahabatmi

Published

on

Mumbai Minister Diwakar Raoute 4242 Conductot Driver post MSRTC

मुंबई |  राज्यातील १५ दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना मोठा दिलासा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील विविध जिल्ह्यातील ४ हजार २४२ चालक वाहक पदांची भरतीची घोषणा  परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज केली.या भरतीत इतर आरक्षणासह मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या १५ जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा या हेतूने एस.टी महामंडळाने या जिल्ह्यात एस.टी महामंडळात ४ हजार २४२ वाहक चालकांची भरती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने औरंगाबद,बीड,जालना, लातूर,नांदेड, उस्मानाबाद, परभणी,अमरावती,अकोला,बुलढाणा, यवतमाळ, धुळे,जळगाव, नाशिक  आणि पुणे या पंधरा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु यापैकी ११ जिल्ह्यात ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत.

बीड,लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात चालक आणि वाहक पदांच्या रिक्त जागा नसल्या तरी या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील बरोजगार पात्र युवकांची निवड करण्यात येवून त्यांना ज्या जिल्ह्यात जागा रिक्त आहेत  त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. या भरतीत इतर आरक्षणासह मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, लवकरच याची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती रावते यांनी दिली.तसेच इतर जिल्ह्यातील विविध रिक्त पदांचा आढावा घेवून जाहिरात काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ही होणारी भरती कायमस्वरूपी तत्वावरील असल्याने या भागातील बेरोजगार युवक युवतींना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून, या पदांसाठी अर्ज करणा-या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परिक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना या व्यतिरिक्त औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेतील ५६० पदांसाठी १५ हजार रूपयांची ठोक रक्कम आणि वार्षिक ५०० रूपयांची वाढ या पद्दतीने ५ वर्षासाठी कंत्राटी पद्दतीने काम करण्याचा विकल्प स्वीकारता येईल असेही रावते यांनी सांगितले.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

छमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील

Mahabatmi

Published

on

मुंबई: ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याबाबत डील केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

दोन वर्षापूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली आणि शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू कमकुवत ठेवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. दरम्यान आमचं सरकार आलं की पुन्हा डान्सबार बंदी आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

डोंबिवली शस्त्रप्रकरणात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे आरोपीची पाठराखण करत असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे पोलिसांनी धनंजय कुलकर्णी यांचा रिमांड मागितला नाही असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.

हा शस्त्रसाठा परदेशी बनावटीच्या आहे.हा साठा भाजपने आणल्याचा आरोप करतानाच किती विदेशी बनावटीचे हत्यार आणले ? ही तस्करी आहे का? संपुर्ण महाराष्ट्रामध्ये ही हत्यार दिली आहेत का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला. दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत अशाच हत्यारांचा वापर झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

मेट्रो काम सुरू असताना रस्त्यात क्रेन कोसळला, जीव जाता जाता वाचला

Mahabatmi

Published

on

पुणे येथील नाशिक फाटा या भागात मेट्रोच्या कामासाठी असलेली क्रेन अचानक रस्त्यावर कोसळल्याने परिसरात खळबळ उड़ाली ,यात कोणतीही  जीवित हानी झालेली नाही, पण दोन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळतेय , पोलीस तिथे पोहचले सोबतच प्रकल्पाचे अधिकारी ही आहे आणि ती क्रेन बाजूला सरकवण्याचे काम करत आहे .उर्वरित तपासणी चालू आहे, या गोंधळामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून परिस्तिथी नियंत्रणात आणायचं काम पोलीस करतायेत.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

Mahabatmi

Published

on

वसई – वसई पूर्व येथील सातिवली येथे आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. सातिवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली. वालिव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.