Connect with us

मुंबई पुणे नाशिक

उत्तर भारतीयांच्या सभेतही राज यांची मराठी अस्मिता

Mahabatmi

Published

on

उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी आपली प्रादेशिक अस्मितेची भूमिका मांडली. तुमच्या राज्याचा विकास न करणाऱ्या नेत्यांना जाब विचारा, असे बजावत महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा उत्कर्ष साधणे हेच माझे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेत्यांनी जास्तीतजास्त काळ देशावर राज्य केले. मात्र तुम्हाला नोकरी-व्यवसायासाठी महाराष्ट्र किंवा अन्य राज्यांत जावे लागते. तेथे अनेकदा अपमानित व्हावे लागते याचा विचार तुम्हीच करा, असे आवाहनही राज यांनी उत्तर भारतीयांना केले.  परप्रांतीयांना राज ठाकरे यांच्या असलेल्या विरोधामागे नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी उत्तर भारतीय महापंचायतन संघाने राज ठाकरे यांना कांदिवली येथे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर आमंत्रित केले होते.

राज  यांनी जाणीवपूर्वक हिंदीमध्ये भाषण करत असल्याचे सुरुवातीलाच सांगितले. या देशाची घटना, कायदे व नियम समजून घेतले तर माझी भूमिका तुम्हाला समजू शकेल असे त्यांनी सांगितले. घटनेने कोणीही कोठेही जाऊ शकतो, परंतु कोठेही व कसेही राहू शकत नाही. यासाठी प्रथम कायदा समजून घ्या. तुम्ही एखाद्या राज्यात गेल्यास तेथील पोलिसांना तुम्ही कशासाठी आला व कोठे काम करणार हे सांगणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात आज झारखंड, बिहार व उत्तर प्रदेशमधून रोज ३८ रेल्वे गाडय़ा भरून माणसे येतात आणि रिकाम्या गाडय़ा परत जातात. महाराष्ट्रात त्यातही मुंबईची क्षमता लक्षात घेता आता तुम्हीच तुमच्या लोकांना येथे येण्यापासून रोखा असेही राज यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मराठी लोकांनाच प्रथम काम मिळाले पाहिजे त्यानंतरच अन्य लोकांचा विचार होऊ शकतो. उद्या तुमच्या राज्यात जर तुमच्या लोकांना काम न देता अन्य राज्यांतील लोकांना काम दिले तर संघर्ष होणारच ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  महाराष्ट्रातील रेल्वे भरतीची जाहिरात महाराष्ट्रात न होता उत्तर प्रदेश व बिहारमध्ये होणार असेल तर ते कोण सहन करणार असा सवाल करून टॅक्सी चालकांनीही महिलांबाबत असभ्य भाषा वापरल्यामुळेच मनसैनिकांनी झटका दिल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

राज ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर

Mahabatmi

Published

on

Raj-Thackeray

मुंबई | लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. परंतु, या कटाबद्दल आपण आधीच बोललो होतो, राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरयांनी आज लगावला.

‘राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवायची आणि समाजात भय निर्माण करायचे. त्यातून पुन्हा सत्ता मिळवायची, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पुण्यातील सभेत केला होता. नेमका हाच विषय राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील सभेत मांडला.

ओवैसी बंधूंच्या मदतीने राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लिम दंगलीचा कट रचला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यावरून शिवसेनेनं आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी राज यांची खिल्ली उडवलीय. आता प्रकाश आंबेडकर यांनीही राज यांच्यावर ‘कॉपी’चा शिक्का मारलाय. त्यामुळे आता राज ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्यातही खटका उडू शकतो.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

दादरला बाबासाहेबांचं नाव नको!

Mahabatmi

Published

on

Prakash-Ambedkar

मुंबई | उपनगरीय रेल्वेवरील दादर स्थानकाचं नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असं करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी तसे स्टीकर्स दादर स्टेशनात चिकटवले.

या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता, दादरचं नाव दादरच राहू द्यावं, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. सँडहर्स्ट रोड, कुलाबा, माहिम, दादर ही नावं तशीच राहिली पाहिजेत.

या नावांमागे एक इतिहास आहे. सात बेटांची मुंबई अखंड करण्यात ज्यांचं योगदान होतं, ज्या माणसांमुळे मुंबई झाली ती नावं कायम राहिली पाहिजेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे दादरच्या नामकरणावरून आंबेडकरांच्या अनुयायांमध्येच दुमत असल्याचं पाहायला मिळतंय.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

व्यापाऱ्याचे अपहरण करुन बेदम मारहाण, 50 लाखाची मागितली खंडणी

Mahabatmi

Published

on

Kalyan

कल्याण | उल्हासनगरमध्ये दहशत माजविणारा कुख्यात गुंड माजी आमदार पप्पू कलानी जेलमध्ये आहे. आत्ता त्याचा मुलगा ओमी कलानी पप्पूचा वारसा चावित असल्याची गंभीर बाब एका घटनेतून समोर आली आहे. त्याच्यावर एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याला कोंडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हे त्याने पन्नास लाखाच्या खंडणीसाठी केले आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असुन एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

एकेकाळी उल्हासनगर मध्ये कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंड पप्पू कलानी याची प्रचंड दहशत होती. पप्पू हा एका हत्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र त्याची पत्नी ज्योती कलानी ही राष्ट्रवादीची आमदार आहे. तर कलानी यांची सून पंचम कलानी ही उल्हासनगरात महापौर आहे. भाजपच्या कृपा आशीर्वादाने महापौर बनली आहे. ओमी कलानी हा येत्या विधानसभा निवडणूकीत भाजपतर्फे आमदारीकी निवडणूक लढविण्याच्या बेतात आहे. त्यासाठी त्याने टिम ओमी कलानी तयार केली आहे. त्याच टीमच्या माध्यमातून त्याने नवा उद्योग सुरु केलाय.खाण तशी माती या म्हणी प्रमाणे ओमीने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल देत एका व्यापाऱ्या कडे 50 लाखाची खंडणी मागितली. त्याचे अपहरण करुन त्याला मारहाण केली. त्याला एक खोलीत कोंडून ठेवले. त्याच्या साथीदारासह त्याने हा प्रताप केला आहे. ओमीसह त्याच्या आठ साथीदारांच्या विरोधात खंडणी, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापाऱ्याचे नाव अनिल कांजानी आहे.अनिल कांजानी आणि अहमदाबादचा व्यापारी सुरेश लालवाणी यांच्यात पैशाची देवाणघेवाण आहे. अनिलला काल काही लोकांनी मुंबई विमानतळावर नेले. त्याठिकाणी सुरेश लालवाणी आला होता. तो पुन्हा अहमदाबादला निघून गेला. अनिल परत कल्याण पूव्रेतील आपल्या दुकानात आला. दुकानात बसलेल्या अनिलला ओमीच्या साथीदारांनी विठ्ठलवाडी येथील प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नेले. त्याला मारहाण केली. तिथून त्याला सिमा रिसॉर्टमध्ये नेले. सिमा रिसॉर्ट हे कलानीच्या मालकीचे आहे. त्याठिकाणीही त्याला मारहाण करण्यात आली. तीन दिवसात पन्नास लाख रुपये दे आणि बाकीचे पैसेही लवकर दे अन्यथा तुझ्या कुटुंबाला संपवू अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला सोडून दिले. अनिलची सुटका झाल्यावर त्याने कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून रितसर तक्रार दिली. पोलिसांनी ओमी कलानीसह सुरेश लालवाणी, निलेश, सनी तेलकर, विकी पंजाबी, विजय शिंदे, संतोष पांडे, कमलेश निकम, गुड्ड रॉय व अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी सनी तेलकर ला अटक केली आहे. पुढील तपास सुरु असुन पोलिस या प्रकरणात काही एक माहिती देत नाहीत. अनिल या घटनेचा मानसिक त्रस झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

  • ओमी कलानीने फेटाळले आरोप

लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपला असून प्रत्येक निवडणूक मध्ये असच माझा व माझा कुटुंबावर राजकीय दबाव आणून हल्ला केला जातो, या प्रकरणी ओमी कलानी यांचा अस म्हणणं आहे की राजकीय दबाव आणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, माझ्यावर हा गुन्हा बनावट आहे, मी घाबरणार नाही, आणि मी सुद्धा पोलिसांना सखोल चौकशी ची मागणी केली आहे.

@गौतम वाघ

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

December 2018
M T W T F S S
     
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.