Connect with us

मुंबई पुणे नाशिक

पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री

Mahabatmi

Published

on

मुंबई : पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम रहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहे. या चौथ्या स्तंभास स्थैर्य देण्यासाठी आम्ही विविध निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या मार्फत आयोजित सह्याद्री अतिथीगृह येथे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृ.पां. सामक जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, लोकमत वृत्त समुहाचे समूह संपादक दिनकर रायकर, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, श्रीमती सविता रणदिवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह प्रमोद डोईफोडे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, गेली चार वर्षे चौथ्या स्तंभाला स्थैर्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. पत्रकारांचा घराबाबतही म्हाडाच्या माध्यमातून योजना तयारी केली आहे. यामध्ये मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा निश्चित झाली आहे. येत्या एक महिन्यात त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांना पूर्णपणे समाविष्ट केले आहे. त्यासाठी मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. या योजनेत पत्रकारांच्या समावेशाबाबत व्यापक व्याख्या केल्याने, पत्रकारांच्या कुटुंबियांनाही आरोग्य सुविधा मिळतील. चौथ्या स्तंभाच्या पाठीशी राज्य सरकार ताकदीने उभे आहे.

जीवनगौरव पुरस्कारार्थी दिनू रणदिवे यांच्या गौरवार्थ मुख्यमंत्री म्हणाले, एका व्रतस्थ पत्रकाराचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हे मोठे भाग्य आहे. त्यांनी प्रत्येक लढ्यात सक्रीय भूमिका निभावली. पत्रकारितेच्या माध्यमातून जनमत तयार करण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकांपर्यंत पोहचण्याकरिता वृत्तपत्र सुरु केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही या वृत्तपत्रातून व्यंगचित्र काढली होती. आज त्यांची जयंती आहे आणि रणदिवे यांना पुरस्कार मिळतो आहे, हा एक चांगला योगायोग आहे. आदर्श पत्रकारांसाठी असणारे सर्व गुण त्यांच्यात आहेत.

युवा पत्रकारांचाही सन्मान करताना आपणास आनंद होतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेते पत्रकार प्राजक्ता पोळ, विश्वास वाघमोडे व महेश तिवारी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला. प्राजक्ता पोळ यांनी कमी कालावधीत चांगले कार्य केले. विश्वास वाघमोडे यांनी शोध पत्रकारिता केली तर महेश तिवारी हे निर्भिड व जनतेची बांधिलकी असलेले पत्रकार आहेत. शासनाच्या चुका होत असतील, तर ते दाखवून देणे हे पत्रकारितेचे कार्यच आहे. आम्हाला जरी खुलासे द्यावे लागले, तरी चालेल पण पत्रकारांनी पत्रकारितेचे हे व्रत जोपासावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार इलेक्ट्रॉनिक  माध्यम- न्यूज १८ लोकमतचे महेश तिवारी, वृत्तपत्र – इंडियन एक्स्प्रेसचे विश्र्वास वाघमोडे, संघाच्या सदस्यांकरिताचा पुरस्कार न्यूज १८ लोकमतच्या प्राजक्ता पोळ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

दिनकर रायकर यांनी दिनू रणदिवे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, असे सांगून त्यांच्यासमवेत केलेल्या पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला. दिनू रणदिवे यांच्या 1974च्या रेल्वे संपाच्या आठवणी सांगितल्या. राजीव खांडेकर यांनी दिनू रणदिवे यांचा वारसा चालविणारे पत्रकार वाढीस लागो. यात समाजहित आहे. पूर्वीच्या पत्रकारितेत सोई सुविधा नव्हत्या पण समाधान होते. ग्लॅमर नव्हते पण प्रतिष्ठा होती. माध्यमांचा पसारा वाढला पण प्रभाव वाढला नाही. आज हे सर्व असले तरी काहीतरी हरविल्याची भावना आहे. अशा भावना व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना दिनू रणदिवे यांनी आपल्या पत्रकारितेचा लेखा जोखा व अनुभव मांडले. पत्रकारिता क्षेत्रातील आपले गुरु पा. वां. गाडगीळ यांच्याप्रती आदर व्यक्त करुन त्यांचे तैलचित्र पत्रकार संघाला भेट दिले असल्याचे सांगितले.संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे कार्य स्पष्ट केले. या जीवनगौरव पुरस्काराबद्दल बोलताना त्यांनी दिनू रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्कार दिल्याने पुरस्काराला उंची प्राप्त झाल्याचे सांगितले.या कार्यक्रमास आमदार कपिल पाटील तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनायाचे संचालक (माहिती/वृत्त) सुरेश वांदिले तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे कुटुंबीय व अन्य पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद लिमये यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी मानले.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Mahabatmi

Published

on

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.

उर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.

उर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

उल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या

Mahabatmi

Published

on

Second murder during election in Ulhasnagar

उल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश

Mahabatmi

Published

on

मुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.

देवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in