Connect with us

मुंबई पुणे नाशिक

मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश

Mahabatmi

Published

on

मुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.

देवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Mahabatmi

Published

on

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.

उर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.

उर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

उल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या

Mahabatmi

Published

on

Second murder during election in Ulhasnagar

उल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

चेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Mahabatmi

Published

on

Eknath Gaikwad

चेंबूर येथील वाशीनाका परिसरात सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असून या सर्वअपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मा. एकनाथराव गायकवाड यांनी केलीआहे. तसेच या अपघातामुळे एमएमआरडीएची जागा हडपण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींचा डाव उघडकीस आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील माहूल रोड येथे सकाळी नऊच्या सुमारास म्हाडा कॉलनीच्या समोरील विनय इंग्लिश हायस्कूलजवळ शौचालयाची सेप्टीक टँक खचण्याचीघटना घडली. या टाकीवर उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकच्या वजनाने ती टाकी खचली. या अपघातात टाकीवर उभे असलेली एक महिला आणि दोन मुले असे तिघे जण या टाकीतपडून अडकले होते. घटनेची माहिती कळताच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने या तीघांनाही बाहेरकाढले असून जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

२००४ पासून एमएमआरडीएने मुंबईच्या इतर भागातून अनेकांना या परिसरात स्थलांतरीत केले आहे.या अपघातानंतर मा. एकनाथराव गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच राजावाडी रुग्णालयात दाखल जखमींचीहीविचारपूस केली. या अपघाताबद्दल त्यांनी स्थानिक नगरसेविका, आमदार आणि खासदारांना जबाबदार धरले. स्थानिक नगरसेविकेने परिसरात समाज मंदिराचे बांधकाम सुरूकेले आहे. या बांधकामाला परवानगी आहे की नाही हे अगोदर तपासावे लागेल, असे सांगत मा. गायकवाड म्हणाले की, ही जागा एमएमआरडीएची असून त्यावर नगरसेवकनिधी वापरून जागा हडप करण्याचा हा डाव आहे. या कामाला स्थानिकांचा विरोध आहे.महापालिकेत त्याविरोधात स्थानिकांनी शेकडो अर्ज केलेत, मात्र नगरसेवक आमदारआणि खासदार हे एकाच पक्षाचे असून त्याच पक्षाची सत्ता महापालिकेत असल्याने महापालिकेचे अधिकारी दबावाखाली काम करतात.

सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींची हीमिलीभगत असून जागा काबीज करून, मग त्यावर दुकाने बांधायची, असा हा गोरखधंदा गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे.तसेच जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. आहे. अवैध बांधकामांसाठी नगरसेवक निधीचा वापर करण्याची परवानगीदिल्याबद्दल वेळ पडल्यास आयुक्तांवरही कारवाई करण्याची गरज असल्याचेही मा. गायकवाड म्हणाले.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in