Connect with us

मुंबई पुणे नाशिक

७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात?

Mahabatmi

Published

on

devendra fadnavis government

मुंबई | राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रियस्तरावरील सुमारे ७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दररोज सचिव गटाची बैठक होत आहे. या मेगा भरतीची जाहिरात पुढच्या आठवड्यात जाहिरात काढण्यात येवून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरती परिक्षा घेतली जाणार असल्याचे समजते.

अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यात ७२ हजार पदांसाठी मेगा भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.मात्र या भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर हि भरती पुढे ढकलण्यात आली होती. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली असून मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणी पुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. मुख्य सचिवांमार्फत दररोज पदभरतीच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जात आहे.

या पदांमध्ये ग्रामीण भागात क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील पदांचा समावेश असून भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि लवकर होण्याकरिता नियोजन केले जात आहे. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.या मेगा भरतीची जाहिरात पुढच्या आठवड्यात काढण्यात येवून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा घेतली जाणार असल्याचे समजते.

  • कोणत्या खात्यात किती जागा भरणार
  1. आरोग्य खात्यात १० हजार ५६८ पदे
  2. गृह खात्यात ७ हजार १११
  3. ग्रामविकास खात्यात ११ हजार
  4. कृषी खात्यात २५००
  5. सार्वजनिक बांधकाम खात्यात ८ हजार ३३७
  6. नगरविकास खात्यात १५००
  7. जलसंपदा खात्यात ८२२७
  8. जलसंधारण खात्यात २ हजार ४२३
  9. पशुसंवर्धन खात्यात १ हजार ४७
  10. मत्स्य खात्यात ९० पदे भरली जाणार आहेत.
Advertisement

मुंबई पुणे नाशिक

मेट्रो काम सुरू असताना रस्त्यात क्रेन कोसळला, जीव जाता जाता वाचला

Mahabatmi

Published

on

पुणे येथील नाशिक फाटा या भागात मेट्रोच्या कामासाठी असलेली क्रेन अचानक रस्त्यावर कोसळल्याने परिसरात खळबळ उड़ाली ,यात कोणतीही  जीवित हानी झालेली नाही, पण दोन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळतेय , पोलीस तिथे पोहचले सोबतच प्रकल्पाचे अधिकारी ही आहे आणि ती क्रेन बाजूला सरकवण्याचे काम करत आहे .उर्वरित तपासणी चालू आहे, या गोंधळामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून परिस्तिथी नियंत्रणात आणायचं काम पोलीस करतायेत.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

Mahabatmi

Published

on

वसई – वसई पूर्व येथील सातिवली येथे आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. सातिवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली. वालिव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

वरळीत साधना इमारतीत लागली आग

Mahabatmi

Published

on

मुंबईतील वरळी येथील साधना हाऊस इमारतीत आग लागल्याची घटना घडाली. अग्निशमन विभागाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

गेल्या आठ दिवसापासून मुंबई व उपनरात आगीच्या घटना घडत आहेत. अंधेरी येथे आठ दिवसापूर्वी कामगार रुग्णालयात आग लागून 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसापूर्वी चेंबुरच्या टिळक नगरात इमारतीत आग लागून 5 जणांचा मृत्यू झाला होता.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.