Connect with us

मुंबई पुणे नाशिक

चंद्रशेखर आझाद यांना अज्ञातस्थळी हलविले,भीम आर्मीच्या 400 कार्यकर्त्याना घेतले ताब्यात

Mahabatmi

Published

on

मुंबई भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मुंबईसह महाराष्ट्रात सभा होऊ नयेत, म्हणून मुंबई पोलिसांनी 300 ते 400 कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद यांना पुण्याला जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दिंडोशी, वनराई, घाटकोपर, समता नगर, शिवाजी पार्क, दादर, वरळी येथील पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले आहे. मात्र तरीही सभा होणारच असा निर्धार भीम आर्मीने केला होता.

हॉटेल मनालीच्या 500 मिटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील सर्व पोलिस स्टेशन हायअलर्ट देण्यात आला आहे.

चंद्रशेखर आझाद मालाडमधील हॉटेल मनालीमध्ये थांबले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी नेल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सभा घेऊ नये म्हणून पोलिस आम्हाला ताब्यात घेत आहेत, अशी माहिती भीम आर्मीकडून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मनाली हाॅटेल परिसर व आसपासच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

भीम आर्मी मुंबई प्रमूख सुनील गायकवाड, मराठवाडा विभाग प्रमुख बलराजजी दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अॅड.सचिन पट्टेबहादूर, अॅड.अखिल शाक्य (सोलापूर) प्रवीण बनसोडे (बुलडाणा) यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाली हाॅटेल येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, भीम आर्मीच्या नियोजित कार्यक्रमाप्रमा

Advertisement

मुंबई पुणे नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश

Mahabatmi

Published

on

कळवण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांपासून तयारी करत असलेल्या डॉ. पवार यांना उमेदवारी नाकारून राष्ट्रवादीने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देऊन युतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, यामुळे डॉ. पवार नाराज झाल्या होत्या. त्यांच्या या नाराजीचा फायदा पालकमंत्री महाजन व भाजपचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेऊन डॉ. पवार यांची भेट घेत भाजपमध्ये या, तुमचा सन्मान करू, असे सांगून राष्ट्रवादीला कोंडीत पकडले. मात्र, डॉ. पवार यांनी आपण भाजपमध्ये येऊ पण उमेदवारी पाहिजेच असा आग्रह कायम ठेवला. त्यामुळे त्यांचा बुधवारचा प्रवेश लांबला होता. यावर भाजपची वरिष्ठ समिती, मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री महाजन यांच्यात चर्चा झाली आणि त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे कळते.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई

Avatar

Published

on

By

मुंबई । लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर अातापर्यंत ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अायाेगाकडून देण्यात आली.

ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनरसंदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.

 

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त

Mahabatmi

Published

on

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या शैक्षणिक ट्रस्टची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेने ट्रस्ट आणि ट्रस्टचे गॅरेंटर यांना दोन महिन्याच्या आत कर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत.

कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टवर बँक आॅफ महाराष्ट्रचे १६ कोटी, स्टेट बँक आॅफ इंडियाचे ३८.६३ कोटी आणि बँक आॅफ इंडियाचे १३.१८ कोटी इतके कर्ज आहे. मात्र कर्ज थकविल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकेकडून या ट्रस्टची कुर्ला आणि खंडाळा येथील संपत्ती जप्त केल्याची माहिती हाती येत आहे. यामध्ये जमीन आणि दोन इमारतींचा समावेश आहे. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टसह मनोहर जोशी यांचा मुलगा आणि गॅरेंटर उन्मेश जोशी, त्यांच्या पत्नी माधवी जोशी तसेच कॉर्पोरेट गॅरेंटर हॉटेल एअरपोर्ट कोहिनूर आणि कोहिनूर प्लेनट कन्सट्रकशन यांना हा निर्देश देण्यात आले आहेत.उन्मेश जोशी यांनी शिवसेनाभवन समोर कोहिनूर सक्वेअर हा प्रोजेक्ट सुरू केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम बंद होते. ९०० कोटींचे कर्ज न फेडल्याने जोशी यांच्या हातून ‘कोहिनूर’ प्रकल्प निसटला आहे. दादरमधील एका आर्कीटेक्ट कंपनीने या प्रोजेक्टचे काम हाती घेतले आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.