राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जावून भेट घेतल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ही भेट राजकीय कारणांसाठीच ही भेट असल्याचे बोलले जात आहे. परंतु शरद पवारांनी सपत्नीक शेलार यांची भेट घेतल्यामुळे या भेटीमागे वेगळे कारणदेखील असण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्यांनी मात्र याबाबत अद्याप काहीही खुलासा केलेला नाही. काही दिवसांपूर्वी बीकेसीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थित भाजपचा मेळावा झाला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या टिकेला उत्तर दिले होते. पवारसाहेब, चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुमचे नमोनिशान उरणार नाही, असे प्रतित्तुर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच छगन भुजबळ यांच्यालगतच्या कोठड्या रिकाम्या असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यातून अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याची भाजपने सूचित केले होते. त्यामुळे कदाचित शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली असावी, असा एक कयास लावला जात आहे.