मुंबईः साडेतीन वर्षात भाजपने पारदर्शक कारभार केला. आरोप करण्यासाठी जागा नसल्याने ते उंदराचा आरोप करू लागले. शरद पवार यांनी चहाचा मुद्दा उपस्थित करून टीका केली. परंतु मी पवार यांना सांगू इच्छितो की, पवारसाहेब चहावाल्याच्या नादी लागू नका, २०१४ साली चहावाल्याने तुमची धुळधाण उडवली आहे, हे विसरू नको असेही ते म्हणाले.

भुजबळांशेजारील तीनचार बराकी रिकाम्या
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला. भ्रष्ट कारभार करणाऱ्यांसाठी छगन भुजबळ यांच्याशेजारील काही बराकी रिकाम्या असल्याचे सांगत विरोधकांवर अप्रत्यक्ष कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.