मुंबई – विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सत्र सुरुळीत चालू दिले नसल्याचा ठपका ठेवत आज देशभर भाजपचे कार्यकर्ते, नेते उपोषणाला बसले आहेत. मुंबईतही भाजपचे उपोषण सुरू असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले आहेत. विलेपार्ले येथे हे एक दिवसीय उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसह मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, परेश रावल, अमित साटम, पराग अळवणी हे देखील उपोषणाला बसले आहेत. विरोधकांच्या आडमुठेपणामुळे अधिवेशनाचे महत्वाचे दिवस वाया गेल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस वारंवार संसदेचे कामकाज बंद पाडून लोकशाहीचा अपमान करत असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात येत आहे