मुंबईः भाजपच्या स्थापना दिनासाठी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. बीकेसीत होत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांनी या भागातून वाहने नेण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे. मात्र, बीकेसी परिसर मूळात व्यावसायिक असल्याने वाहतूक कोंडी अटळ आहे. त्याचे परिणाम आज सकाळपासून दिसत आहेत. सामान्य चाकरमन्यांना पोलिसांनी त्या मार्गावरून जाण्यास-येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे कामधंद्यावर जाणारे मुंबईकर चांगलेच कावले आहेत. काहींनी भाजपच्या बस अडवल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि नागरिक यांच्यात चांगल्याच चकमकी होत आहेत.