भाजप स्थापना दिनानिमित देशभरातून भाजप कार्यकर्ते मुंबईत येत आहेत यामुळे मुंबईत मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी झालीय. या कोंडीत मात्र मुंबईकरांना बस मिळेनासे झाले आहे. त्यामुळे सतंप्त मुंबईकर भाजप मेळाव्याला जाणा-या बसच रोखून धरले आहे.

महामेळाव्याला येणा-यासांठी भाजप सरकाने स्पेशल ट्रेन आणि बसची सोय केली आहे. मात्र संपुर्ण मुंबईत मात्र वाहातूककोंडी झालीय. याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. सीएसटीकडून बीकेसीकेडे जाण-या भाजप कर्यकर्त्यांना बस मिळत आहे. पण सामान्य माणसांना बस मिळत नाहीये यामुळे वैतागलेले मुंबईकर बीकेसीकडे जाणा-या बसला रस्त्यावर रोखून ठेवले