नवी मुंबई – रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आर्थिक गुन्हे शाखेचे एसीपी राजकुमार चाफेकर यांचा ठावठिकाणा अखेर  लागला. एसीपी चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे असल्याचे समोर आले आहे. चाफेकर दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
एसीपी राजकुमार चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या रेल्वे स्थानकावर सापडले. त्यांना आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मात्र ते नेमके जबलपूरला का व कसे गेले नेमके कारण काय याविषयीचे गूढ निर्माण झाले आहे.