Connect with us

महाराष्ट्र

कोण आहेत नितीन नांदगावकर?

Mahabatmi

Published

on

Who is Nitin Nandgaonkar?

मुंबई | नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत, आजवर नितीन नांदगावकर यांनी जेथे जेथे मराठी माणसांवर अन्याय होत असेल तेथे स्वतः पुढाकार घेऊन असंख्य मराठी माणसाला आपल्या वेगळ्याच रांगड्या स्टाईलने न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

नितीन नांदगावकर हे गोरगरिब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आठवड्यातील दर बुधवारी ‘जनता दरबार’ भरवतात, नितीन नांदगावकर यांच्या जनता दरबारात न्याय मागण्यासाठी राज्यातून व देशातून असंख्य लोक गर्दी करत असतात.

यापुर्वी ‘जनता दरबार’ कै. आनंद दिघे हे भरवत असत पण त्यांच्या निधनामुळे ‘जनता दरबार’ बंद झाला. अगदी त्याच प्रकारचा जनता दरबार आज नितीन नांदगावकर भरवत आहेत आणि काहींना या दरबारात काही तासात तर काहींना काही दिवसांत न्याय मिळत आहे.

आम्ही जेंव्हा नितीन नांदगावकर यांना म्हणालो, “तुम्ही तर आता आनंद दिघे झाले आहेत”. यावर नितीन नांदगावकर यांनी आपल्या मोठेपणाचे दर्शन घडवत म्हणाले की, “मी कै. आनंद दिघे साहेबांच्या चरणांची धुळ जरी झालो तरी मी माझ्या आयुष्याचे सार्थक झाले असे समजेन”.

काय होतं नेमकं प्रकरण :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नितीन नांदगावकर यांचा सोशल मीडियावर प्रचंड दबदबा आहे. त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजला २ लाखाहून अधिक आवडी आहेत, तसेच त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोंच्या संख्येने हिट्स येतात.

मनसेच्या ‘राईझींग स्टार’ला नुकताच मुंबई पोलिसांनी २ वर्षाची तडीपारीची नोटीस पाठवली.

नितीन यांनी मेट्रोच्या कामात अडथळा निर्माण केला असा एक आरोप मुंबई पोलिसांनी या नोटीसीत लिहलं असल्याची माहिती मिळत आहे. तसेच कुर्ला येथील भुयारी मार्गात एका गर्दुल्ल्याला नांदगावकर यांनी चांगलाच चोप दिला होता, त्यामुळे त्यांच्यावर ११ कलमे लावली आणि अटक सुद्धा करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या गर्दुल्ल्याला मारलं त्याकडे ब्लेड्स आणि स्क्रूड्राइव्हर होते तरी त्याला ₹१२०० घेऊन पोलिसांनी सोडले.
त्याचप्रमाणे अनधिकृत परवाने असलेले परप्रांतीय टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मारल्याचेही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत. त्याचप्रमाणे एका मोठ्या बिल्डरचा ही या तडीपारी मागे हात असल्याचं सांगितलं जात आहे.

अमित ठाकरे यांनी नितीन नांदगावकरांची घेतली भेट :-

मुंबई पोलिसांनी नांदगावकर यांना तडीपारीची नोटीस बजावल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नितीन नांदगावकर यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवून घेतले. अमित ठाकरे यांनी नितीन नांदगावकर यांचे कौतुक केले तसेच तुम्ही तुमचे कार्य करत राहा बाकी सगळं आम्ही बघू असे अमित ठाकरे ह्यांनी नितीन नांदगावकारांना सांगितले. दरम्यान राज ठाकरे सुद्धा नितीन नांदगावकारांना भेटले असून अख्खी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व तडीपारीच्या नोटीसीबद्दल काळजी करू नका असे राज ठाकरे यांनी नितीन नांदगावकर यांना सांगितल्याचे सूत्रांकडून कळत आहे. तसेच नांदगावकरांनी केलेल्या कार्याचे राज ठाकरेंनी कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.

Advertisement

महाराष्ट्र

टँकर आणि क्रूझरचच्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू

Mahabatmi

Published

on

बेळगाव- गोव्यात होळी साजरी करून घरी परतत असलेल्या तरूणांचा बेळगावमध्ये भीषण अपघात झाला. हे सर्व तरूण ज्या क्रूझर गाडीने येत होते, त्या गाडीने टँकरला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात गाडीतील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व मृत तरूण कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूरचे रहिवासी आहेत. होळी साजरी करण्यासाठी हे सर्वजण गोव्याला गेले होते. होळी साजरी करून ते गोव्याहून घरी परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

क्रझरचा चालक गाडी अतिवेगाने चालवत होता, शिवाय त्याला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

वैशाली येडे यांना बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर

Mahabatmi

Published

on

मुंबई : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटक वैशाली येडे यांना आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली. वैशाली या यवतमाळ-वाशिम येथून लढणार असून राजकारणातील घराणेशाहीला तोडण्यासाठी आणि राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी वैशाली यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

वैशाली येडे या शेतकरी विधवा आहेत. त्या शेतकरयांच्या विशेषत: त्यांच्या जीवनावर आधारित नाटक ‘तेरव’मध्ये जनाबार्इंची भूमिका साकारतात. वादग्रस्त ठरलेल्या ९२व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाचा मान वैशाली यांना मिळाला होता.

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटन म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यीकाच्या हस्ते का? असा प्रश्न राजकीय पक्षांनी उपस्थित केला. त्यांचे आमंत्रण रद्द केल्यानंतर वैशाली येडे यांना नवीन उद्घाटक म्हणून मान देण्यात आला. वैशाली यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना २ मुले आहेत. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत.

Continue Reading

महाराष्ट्र

मधल्या सुट्टीत विद्यार्थी वाचताहेत इंग्रजी कथांची पुस्तकं!

Mahabatmi

Published

on

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी शाळेची मधली सुट्टी म्हणजे एकमेकांचा डबा खाणं आणि धांगडधिंगा-मस्ती! पण सायन येथील डी.एस.हायस्कुलमधील मुलं याला अपवाद ठरली आहेत. मधल्या सुट्टीच्या अर्ध्या तासात ही मुलं देश-विदेशातल्या गोष्टींची इंग्रजी पुस्तकं वाचण्यासाठी धडपडतात. याचं श्रेय जातं शाळेत चालवल्या जाणाऱ्या ‘स्पोकन इंग्रजी’च्या उपक्रमाला.मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शाळेत गेल्या चार वर्षांपासून स्पोकन इंग्रजीचा विशेष वर्ग नियमितपणे राबवला जातोय. शाळेने त्यासाठी पाच तज्ञ शिक्षकांची नेमणूकच केली आहे. शाळेतील विद्यार्थ्याचं बोली इंग्रजी सुधारावे, यासाठी हे शिक्षक नवनवे प्रयोग करत असतात.

२०१८ च्या सप्टेंबर महिन्यात शाळेच्या विश्वास्ताच्या सहकार्याने स्पोकन इंग्रजीच्या खोलीत ३५० पुस्तकांची एक लहानशी लायब्ररी बनवण्यात आली. या लायब्ररीत लहान मुलांना आवडतील आणि समजतील अशी इंग्रजी भाषेतील गोष्टींची तसंच चित्रकथांची पुस्तकं, कॉमिक्स कथा यांचा समावेश आहे. मुलांनी मधल्या सुट्टीत किंवा वेळ मिळेल तेव्हा ही पुस्तकं वाचायला यावं असं आवाहन करण्यात आलं, आणि म्हणता म्हणता विद्यार्थ्याचा इतका प्रतिसाद लाभू लागला की, स्पोकन इंग्रजीचा वर्गच त्यासाठी कमी पडू लागला.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.