Connect with us

महाराष्ट्र

धक्कादायक ! धनगर आरक्षणाची कागदपत्रे कोर्टातून गायब

Mahabatmi

Published

on

मुंबई – धनगर आरक्षणाची कागदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धनगर आरक्षणाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी वकिलांनी धनगर आरक्षणाचे कागदपत्रे सापडत नाहीत, अशी माहिती दिल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारी वकिलांच्या या उत्तराने कोर्ट परिसरात सर्वचजण अवाक झाले आहेत.धनगर हेच धांगड आदिवासी असे, संविधान विरोधी व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने दिलेला अहवाल डावलणारे खोटे प्रतिज्ञापत्र 12 मार्च रोजी उच्च न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शासनाच्या या निर्णयास आदिवासी हक्क संरक्षण समितीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध करुन आपला विरोध दर्शवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला खुष करण्यासाठी आदिवासी समाजाचे आरक्षण धोक्यात आणून धनगर समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहन समितीने केले होते.

धनगर हेच धांगड आदिवासी असे, संविधान विरोधी व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने दिलेला अहवाल डावलणारे खोटे प्रतिज्ञापत्र आणि काही महत्त्वाची कागदोपत्रे आज उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र, धनगर आरक्षणाची कागदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कागदपत्रे सापडत नाहीत, त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. त्यानंतर, उच्च न्यायालयानेही ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे शासनातर्फे सांगितले जात आहे. परंतु, मुळात धनगर आदिवासी नाहीतच हे प्रखर वास्तव असल्याने कोणत्याही परिस्थितीत धनगरांचा समावेश आदिवासींमध्ये होऊ शकत नाही. केवळ धनगर समाज आंदोलन करत असल्याने काही मतदार संघात त्यांचे मतदान निवडणुकीवर परिणाम करू शकते, या भीतीने शासन संविधान पायदळी तुडवून धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करत आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने धनगर आदिवासी नसल्याचे स्पष्टपणे सिध्द केले आहे. त्याचप्रमाणे संविधानातील पाचव्या अनुसूचीतील तरतुदीनुसार आदिवासी सल्लागर परिषदेची मान्यता घेतल्याशिवाय कोणत्याही जातीचा समावेश आदिवासींच्या यादीत करता येत नाही. तरी सुद्धा महाराष्ट्राच्या आदिवासी यादीत 36 व्या क्रमांकावर असलेल्या ओरान धांगड ही जमात म्हणजे ह्यधनगर ह्णअसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून शासनाकडून संविधानाची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे आदिवासी हक्क संरक्षण समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Advertisement

महाराष्ट्र

टँकर आणि क्रूझरचच्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू

Mahabatmi

Published

on

बेळगाव- गोव्यात होळी साजरी करून घरी परतत असलेल्या तरूणांचा बेळगावमध्ये भीषण अपघात झाला. हे सर्व तरूण ज्या क्रूझर गाडीने येत होते, त्या गाडीने टँकरला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात गाडीतील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व मृत तरूण कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूरचे रहिवासी आहेत. होळी साजरी करण्यासाठी हे सर्वजण गोव्याला गेले होते. होळी साजरी करून ते गोव्याहून घरी परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

क्रझरचा चालक गाडी अतिवेगाने चालवत होता, शिवाय त्याला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

वैशाली येडे यांना बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर

Mahabatmi

Published

on

मुंबई : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटक वैशाली येडे यांना आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली. वैशाली या यवतमाळ-वाशिम येथून लढणार असून राजकारणातील घराणेशाहीला तोडण्यासाठी आणि राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी वैशाली यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

वैशाली येडे या शेतकरी विधवा आहेत. त्या शेतकरयांच्या विशेषत: त्यांच्या जीवनावर आधारित नाटक ‘तेरव’मध्ये जनाबार्इंची भूमिका साकारतात. वादग्रस्त ठरलेल्या ९२व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाचा मान वैशाली यांना मिळाला होता.

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटन म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यीकाच्या हस्ते का? असा प्रश्न राजकीय पक्षांनी उपस्थित केला. त्यांचे आमंत्रण रद्द केल्यानंतर वैशाली येडे यांना नवीन उद्घाटक म्हणून मान देण्यात आला. वैशाली यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना २ मुले आहेत. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत.

Continue Reading

महाराष्ट्र

मधल्या सुट्टीत विद्यार्थी वाचताहेत इंग्रजी कथांची पुस्तकं!

Mahabatmi

Published

on

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी शाळेची मधली सुट्टी म्हणजे एकमेकांचा डबा खाणं आणि धांगडधिंगा-मस्ती! पण सायन येथील डी.एस.हायस्कुलमधील मुलं याला अपवाद ठरली आहेत. मधल्या सुट्टीच्या अर्ध्या तासात ही मुलं देश-विदेशातल्या गोष्टींची इंग्रजी पुस्तकं वाचण्यासाठी धडपडतात. याचं श्रेय जातं शाळेत चालवल्या जाणाऱ्या ‘स्पोकन इंग्रजी’च्या उपक्रमाला.मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शाळेत गेल्या चार वर्षांपासून स्पोकन इंग्रजीचा विशेष वर्ग नियमितपणे राबवला जातोय. शाळेने त्यासाठी पाच तज्ञ शिक्षकांची नेमणूकच केली आहे. शाळेतील विद्यार्थ्याचं बोली इंग्रजी सुधारावे, यासाठी हे शिक्षक नवनवे प्रयोग करत असतात.

२०१८ च्या सप्टेंबर महिन्यात शाळेच्या विश्वास्ताच्या सहकार्याने स्पोकन इंग्रजीच्या खोलीत ३५० पुस्तकांची एक लहानशी लायब्ररी बनवण्यात आली. या लायब्ररीत लहान मुलांना आवडतील आणि समजतील अशी इंग्रजी भाषेतील गोष्टींची तसंच चित्रकथांची पुस्तकं, कॉमिक्स कथा यांचा समावेश आहे. मुलांनी मधल्या सुट्टीत किंवा वेळ मिळेल तेव्हा ही पुस्तकं वाचायला यावं असं आवाहन करण्यात आलं, आणि म्हणता म्हणता विद्यार्थ्याचा इतका प्रतिसाद लाभू लागला की, स्पोकन इंग्रजीचा वर्गच त्यासाठी कमी पडू लागला.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.