Connect with us

महाराष्ट्र

मेगा भरतीत मराठा तरुणांना मिळणार ११५२० नोकऱ्या !

Mahabatmi

Published

on

Maratha-Aarkshan

मुंबई | राज्य शासनाने मराठा समाजाला विशेष प्रवर्ग करून जाहीर केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा फायदा लगेच मिळणार असून नोकरीच्या मेगा भरतीत मराठा तरुण,तरुणींना ११५२० नोकऱ्या मिळणार आहेत.या बाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला आहे .

सामाजिक आणि शैक्षणिक हा नविन प्रवर्ग तयार करण्यात येवून त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या लोकसेवा मधिल शासकीय, निमशिसकीय, सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांचे आज सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण निश्चित केले आहे.या निराणयानुसार यापुढील रिक्त असणारी पदे ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी म्हणजेच मराठा समाजासाठी आरक्षित असणार आहे.

हा निर्णय राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका,नगरपालिका,शैक्षणिक संस्था,स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद, महामंडळे, विद्यापीठ, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम,इत्यादींना लागू राहिल.हा आदेश ३० नोव्हेंबर २०१८ पासून लागू करण्यात आला असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आला असल्याने यापुढील सर्व भरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे.सरळसेवा भरतीत आरक्षणाच्या तरतुदीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाला समाविष्ट करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सुधारित बिंदूनामावली निश्चित केली आहे. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित ४८ टक्के खुल्या प्रवर्गातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.

राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली असून ७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिध्द होवून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.३० नोव्हेंबर २०१८ रोजी रिक्त असलेली पदे आणि त्यानंतर सरळसेवा कोट्यातील रिक्त होणारी संभाव्य पदे भरताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात यापुढील भरती प्रक्रियेत मराठा समाजाला गणले जाणार आहे.

एकूण ७२ हजार पदे भरली जाणार असून,पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात – ३६ हजार पदे भरली जातील.सध्या राज्यात १ लाख ८० हजार पदे रिक्त आहेत.७२ हजारांपैकी ५ हजार पदे क्लास १ आणि क्लास २ संवर्गातील आहेत.६७ हजार पदे क्लास ३ आणि क्लास ४ संवर्गात भरली जातील.

Advertisement

महाराष्ट्र

महाराष्ट्राची १२ कोटी जनता तुमच्या सोबत – सीमा भागातील मराठी बांधवांना दिला विश्वास

Mahabatmi

Published

on

Maharashtra's 12 million people Active with you

बेळगाव | “तुमचं आमचं नातं रक्ताचं आहे, महाराष्ट्राचं आहे. बेळगाव सीमावासीय गेल्या साठ वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत, आपल्या लढाईला माझा मानाचा मुजरा. बेळगांवसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई मतांची नाही तर मातीची आहे.” असे म्हणत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सीमावासीयांची मनं जिंकली.

गेल्या साठ वर्षांपासून कर्नाटकच्या सीमेलगतचे बेळगावसह सुमारे साडे आठशे मराठी भाषिक गांव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी धडपडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने आज बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता याप्रसंगी धनंजय मुंडे उपस्थित होते.

“कर्नाटक सरकारला अधिकृत दौरा कळवून इथं आलो, त्यांनी प्रोटोकॉल पाळायला नकार दिला पण मी इथे प्रोटोकॉलसाठी नाही तर माझ्या महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी इथे आलो आहे. तुमचं आमचं नातं रक्ताचं आहे, महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्राची १२ कोटी जनता तुमच्या सोबत आहे. माझ्या नेत्यांनी म्हणजे शरद पवार साहेबांनी या लढाईत पाठीवर काठी खाल्ली आहे; मी तुम्हांला शब्द देतो की जीवात जीव असेपर्यंत मी तुमच्या हक्कासाठी लढत राहीन. अन्यायी कर्नाटक सरकारला नक्की आपल्या लढ्यापुढे झुकावेच लागेल” असा इशारा मुंडेंनी मेळाव्यात केले.

“गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. पण, मुळात ही लढाई मतांची नाही तर मातीची आहे, नात्यांची आहे, रक्ताची आहे. कधीही आवाज द्या मी तुमच्यासाठी ऊभा राहीन; मग ते महाराष्ट्राच्या सभागृहात असो की रस्त्यावर, न्यायालयात असो की कोणत्या सरकारसमोर. इथून गेल्यावर बेळगांव प्रश्नी मी त्वरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भाग पाडू” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी लढ्याची पुढची रुपरेषा घोषीत केली. ही लढाई आता तरुणांनी हाती घ्यावी असे आवाहन ही मुंडे यांनी केले.

या मेळाव्यास एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील, माजी महापौर मालोजी आष्ठेकर, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे, प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, उपमहापौर मधुश्री पुजारी आदी उपस्थित होते.

  • तर आपल्याच राज्या सोबतही भांडावे लागेल

महाराष्ट्र – कर्नाटक उच्चाधीकार समितीची मागील 4 वर्षात एकदाही बैठक झाली नाही, तसेच तज्ञ समितीची बैठकही झाली नाही.समनव्यक असलेल्या जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असूनही एकदाही बेळगावला आले नाहीत, सरकारचा असाच नकारात्मक भाव राहिला तर आपल्याला कर्नाटक सोबत महाराष्ट्र सरकार सोबतही लढावे लागेल असे कार्यक्रमा नंतर पत्रकारांशी बोलतांना मुंडे म्हणाले.

Continue Reading

महाराष्ट्र

सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी धनंजय मुंडे सोमवारी बेळगांव मध्ये

Mahabatmi

Published

on

Dhananjay Munde at the Vidhan Bhavan for the second day of Maharashtra Legislature special three-day session to pass the state Goods and Services Tax (SGST) bill. The legislature will pass three bills - the main 116-page SGST Act, a bill related to the Compensation to Local Authorities and a bill on to the existing state laws that are to be repealed when the SGST comes into effect from July 1. This is for the first time that the Legislature will have a sitting on a Sunday that is May 21. Express photo by Amit Chakravarty, 21th May 2017, Mumbai. *** Local Caption *** Dhananjay Munde at the Vidhan Bhavan for the second day of Maharashtra Legislature special three-day session to pass the state Goods and Services Tax (SGST) bill. The legislature will pass three bills - the main 116-page SGST Act, a bill related to the Compensation to Local Authorities and a bill on to the existing state laws that are to be repealed when the SGST comes into effect from July 1. This is for the first time that the Legislature will have a sitting on a Sunday that is May 21. Express photo by Amit Chakravarty, 21th May 2017, Mumbai.

कोल्हापूर | कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सोमवारी बेळगांव मध्ये जाणार आहेत.

कर्नाटक सरकारचे मंगळवार पासून बेळगाव मध्ये अधिवेशन सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनेही सोमवारी बेळगाव मध्ये मराठी बांधवांचा महा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास धनंजय मुंडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये धनंजय मुंडे यांच्या भाषणाची मोठी क्रेझ असून ते या भागात प्रथमच येत असल्याने मराठी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंडे हे सकाळी 11 वाजता बेळगाव येथे पोहचणार असून त्यासाठी त्यांचे रविवारी संध्याकाळीच कोल्हापुरात आगमन झाले आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

भाजपच्या नेत्यांची सत्तेची मस्ती जनताच उतरवेल | अशोक चव्हाण

Mahabatmi

Published

on

अमरावती | संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याच्या तिस-या दिवसाची सुरूवात अमरावती येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. रस्त्यात गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. जनसंघर्ष यात्रा दर्यापुरातील बसस्थानक चौकात पोहोचल्यावर प्रमुख नेत्यांनी संविधानाची प्रत ठेवलेली पालखी खांद्यावर घेऊन संविधान बचाओ दिंडी काढली. या संविधान बचाओ दिंडीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर विशाल जनसंघर्ष सभेला संबोधित करताना खा. अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा खरपूस समाचार घेतला.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

December 2018
M T W T F S S
     
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.